नाशिक : पिंपळनेरमध्ये ६ घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान | पुढारी

नाशिक : पिंपळनेरमध्ये ६ घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे भीषण आगीत सहा घरे जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीत प्रापंचीक साहित्य जळल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  ही घटना काल रात्री १ च्या सुमारास घडली.

चलो इंडोनेशिया – पर्यटकांना मिळणार १० वर्षांचा व्हिसा

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेरच्या कुंभार गल्लीतील सहा घरांना रात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये ग. भा. सरला, रमेश बागुल, जीभाऊ शिवराम बागुल, दिलीप शिवराम बागुल, धोंडू शिवराम बागुल, बाळू गोटू सोनवणे, गोपाल साहेबराव सोनवणे यांची घरे जळून खाक झालीत. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग पसरू नये म्हणून तातडीने वीजपुरवठा बंद करण्यात आला. पहाटे ३.३० च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दीपावलीच्या मुहूर्तावर सहा कुटुंबांची घरे जळून खाक झाल्याने या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सचिन साळुंखे यांच्यासह पोलीस पथकाने पाहणी करून पंचनामा केला.

हेही वाचा :

Back to top button