White House : तालिबान नव्या सरकारच्या मान्यतेस अमेरिकेचा नकार?

White House : तालिबान नव्या सरकारच्या मान्यतेस अमेरिकेचा नकार?

वाॅशिंग्टन, पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने (White House) अर्थात व्हाईट हाऊसने सांगितले की,अमेरिका ही अफगाणिस्तानमध्ये नव्याने तयार होणाऱ्या अंतिम सरकारला मान्यता इच्छुक नाही. तर, तालिबानच्या कचाट्यात सापडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तालिबान्यांशी चर्चा करत आहे.

व्हाईट हाऊसचे (White House) प्रेस सचिव जेन साकी यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले की, "तालिबान जागतिक पातळीवरील सन्मानित देश आहे, असं इथल्या प्रशासनातील कोणताही सदस्य, राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रीय सुरक्षा दलातील कोणी सदस्या मानत नाहीत. तालिबान्यांसंदर्भात सकारात्मक असा विचार आम्ही केलेला नाही. या नव्या तालिबान मंत्रीमंडळातील सदस्य असेही आहे, जे तुरुंगात जाऊन आले आहेत."

"आम्ही असं म्हंटलेलं नाही की, तालिबान सरकारला मान्यता दिली आहे. इतकंच नाही तर तालिबान सरकारला मान्यता देण्याचीही घाई करणार नाही. या संकटग्रस्त देशात अडकलेले अमेरिकन नागरिक, अधिकारी अफगाणिस्तानातून बाहेर करण्यासाठी तालिबान्यांसोबत चर्चा करत आहे", असं जेन साकी यांनी सांगितलं.

साकी पुढे म्हणाले की, "आता तालिबान्यांसोबत चर्चा करायचं म्हंटलं. तर त्यांचा नवा मंत्री हक्कानी नेटवर्क दहशतवादी आहे. तो बाॅम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी आहे, ज्या स्फोटात ६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या सैन्यावर सीमेपलिकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये तो सहभागी आहे. त्याच्या १ करोड डाॅलरचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे, असं सर्व असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा का करतो आहे", असा प्रश्न जेव साकी यांनी उपस्थित केलेला आहे.

"अफगाणिस्तानमधून बाहेर पडणाऱ्या लोकांना तालिबानी सोडतात की, नाही… यावर अमेरिका लक्ष ठेवून आहे. ते महिलांशी केस वागतात आणि सध्याची त्यांची वागण्याची पद्धत कशी आहे, या सर्व गोष्टींमुळे अमेरिका तालिबानच्या नवनिर्मित सरकारला मान्यता द्यायची की, नाही, या गोंधळात आहे", असं स्पष्टीकरण अमेरिकेचे प्रेस सचिव जेन साकी यांनी दिलं आहे.

पहा व्हिडीओ : पुणे एनिमल्स राबवतंय भटक्या कुत्र्यांसाठी चालती फिरती खानावळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news