bhagyashree mote engaged : भाग्यश्रीचा सुंदर हिरव्या साडीत साखरपुडा | पुढारी

bhagyashree mote engaged : भाग्यश्रीचा सुंदर हिरव्या साडीत साखरपुडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिलीय. तिचा साखरपुडा पार पडलाय. या सुंदर क्षणांचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. तिने या फोटोंना कॅप्शन देत म्हटलंय-‘मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत जीवनाची नवीन क्षितिजे आखत आहे! तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा असाव्यात!💕 #engaged’. विजय पलांडे असं तिच्या होणाऱ्या पतीचं नाव असून तो एक मेकअप डिझायनर आहे.

भाग्यश्री सोबतच विजयनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. विजयने शेअर केलेल्या फोटोंना Celebrating Us!❤️ अशी कॅप्शन दिलीय. तर आणखी एका फोटोला हार्ट इमोजी शेअर करून ❤️ #Engaged असं लिहिलं आहे. खास म्हणजे विजयच्या फोटोंना बॉलिवूड अभिनेता ऋितिक रोशनने Beautiful ❤️ god bless ! अशी कमेंट केलीय.

भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिलंय- साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास तर छान होतोच पण तुमच्या प्रवासाचा साक्षीदार असलेला हा दिवस अविस्मरणीय राहो 🎉 माझ प्रेम ,साथ आणि आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि राहतील. दुसऱ्या युजरने लिहिलंय- सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील खूप मोठी झालीस मनपूर्वक शुभेच्छा भावी जीवनासाठी❤️. आणखी एका युजरने लिहिलंय-Congartulation dear🎊💕

भाग्यश्रीने आणखी काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंना तिने शुभारंभ!🌼 #family #extendedfamily अशी कॅप्शन लिहिलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Palande (@vjypalande)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Palande (@vjypalande)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

Back to top button