कांदा खातोय ‘भाव’, श्रीरामपुरात दर 2,451 रुपयांवर | पुढारी

कांदा खातोय ‘भाव’, श्रीरामपुरात दर 2,451 रुपयांवर

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  येथील बाजार समितीमध्ये ऐन दिवाळी सणाअगोदर कांदा दर वधारत असल्याने उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र आहे. कांदा लुज मार्केटमध्ये 52 साधनांमधून 768.20 क्विंटल कांदा आवक झाली. कांदा बाजारभाव नं. 1 कांदा कमीत- कमी 1,500 ते जास्तीत- जास्त 2,451 रु. क्विंटल, नंबर 2 कमीत- कमी 900 ते जास्तीत- जास्त 1450 व नंबर 3 कांदा कमीत- कमी 300 ते जास्तीत- जास्त 850 क्विंटल तर गोल्टी कमीत-कमी 950 ते जास्तीत- जास्त रु. 1,450 भाव निघाले.

भुसार गोणी मार्केटमध्ये हरबरा 8 क्विंटल आवक झाली. कमीत- कमी 3,650 रुपये, जास्तीत- जास्त 4 हजार तर सरासरी 3,850 रुपये भाव निघाले. सोयाबीन 10 क्विंटल आवक झाली. कमीत- कमी 4 हजार रु., जास्तीत- जास्त 4,250 रुपये तर सरासरी 4,525 रु. भाव निघाले. लुज मार्केटमध्ये सोयाबीन 25 क्विंटल आवक झाली. कमीत- कमी 4,411 रु. जास्तीत- जास्त रु. 5175 रुपये तर सरासरी 4725 रु. भाव निघाल्याचे सांगण्यात आले.

Back to top button