राहुरी : बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला | पुढारी

राहुरी : बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला

राहुरी : दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेले बाबासाहेब गुंड या वृद्ध इसमाचा मृतदेह आज (दि. 11) रोजी माहेगाव परिसरात प्रवरा नदीपात्रात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

बाबासाहेब मुरलीधर गुंड (वय 64, रा. लाख, ता. राहुरी) हे दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. आज सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यात माहेगाव परिसरात एक इसम प्रवरा नदीपात्रात मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळला. काही तरूणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

Back to top button