साजिद खानला बिग बॉसच्या शोमधून हटवा, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचे पत्र | पुढारी

साजिद खानला बिग बॉसच्या शोमधून हटवा, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचे पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : साजिद खानच्या बिग बॉसमधील एन्ट्रीने धुमाकूळ उडाला आहे. साजिद खान या शोमध्ये गेल्याने अभिनेत्री मंदाना करीमी हिने बॉलिवूड सोडल्याची घटना नुकताच घडली आहे. सोशल मीडियावरदेखील साजिद खानला हटवण्यासाठी ट्विट आणि पोस्ट केले जात होते. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी चित्रपट निर्माते आणि ‘मी टू’ आरोपी साजिद खानच्या ‘बिग बॉस १६’ मधील एन्ट्रीवर आक्षेप घेतला आहे, त्यांनी पत्रामध्ये साजिद खानला शोतून हटवण्याची मागणीदेखील केली आहे. २०१८ मध्ये ‘मी टू’ आंदोलनादरम्यान अनेक महिलांनी साजिदवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत लिहिलं की, “‘मी टू’ मोहिमेदरम्यान, १० महिलांनी साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हे सर्व तक्रार साजिदची घाणेरडी मानसिकता दर्शवते. ‘बिग बॉस’मध्ये त्यांना जी एन्ट्री दिली आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे. मी अनुराग ठाकुर यांना लिहिलं आहे की साजिद खानला या शोतून हटवावं.”

‘मी टू’ आंदोलनदरम्यान, साजिदवर आरोप करणारी अभिनेत्री मंदाना करीमीने याआधी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आता बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा नाही. कारण, साजिदला शोमध्ये स्थान दिलं आहे. शिवाय, गायिका सोना महापात्राने देखील शोच्या निर्मात्यांना साजिदच्या एंट्रीवरून प्रश्न उपस्थित केला होता.

Back to top button