धारवाडजवळ कार अपघातात काँग्रेस ब्लॉक अध्यक्षासह एकजण ठार | पुढारी

धारवाडजवळ कार अपघातात काँग्रेस ब्लॉक अध्यक्षासह एकजण ठार

अंकली; पुढारी वृत्तसेवा : धारवाडजवळ कार अपघातात मुनवळ्ळी काँग्रेस ब्लॉक अध्यक्षासह त्यांच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१०) रात्री घडली. भरधाव कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याकडे असलेल्या पुलाला धडकून कार पलटी झाली. धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली. पुढील तपास पोलीस करत आहेत. यरगट्टी मुनवळ्ळी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष यशवंत यलीगार (वय २६) व त्यांचे मित्र अक्षय विजय कडकोळ (वय २५), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत धारवाड ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यशवंत यलीगार व त्यांचे मित्र अक्षय कडकोळ हे दोघेही कारने धारवाडहून बेळगावला येत होते. धारवाड कित्तूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाला कारची जोरदार धडक बसली. या धडकेत कार पलटी झाल्याने यशवंत यलिगार हे जागीच ठार झाले. तर त्याचे मित्र अक्षय हा कारचा दरवाजा उचकटल्याने बाहेर फेकले गेल्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

दोन्ही मृतदेह धारवाड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी यरगट्टी मुनवळ्ळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button