Vivek Agnihotri : द कश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने मुंबईत घेतलं १७ कोटींचं घर | पुढारी

Vivek Agnihotri : द कश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने मुंबईत घेतलं १७ कोटींचं घर

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी काळी उत्तर प्रदेशमधील छप्पराच्या घरात राहणाऱ्या काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकाने तब्बल १७ कोटींचं नवं घर घेतलं आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी मुंबईतील अंधेरी भागात एक अपार्टमेंट (Vivek Agnihotri ) खरेदी केलं आहे. या घराची किंमत पाहून सर्वांचे डोळे विस्फारतील. रिपोर्टनुसार, हे अपार्टमेंट त्यांनी Ectasy Realty मध्ये घेतलं आहे. रिपोर्टनुसार, विवेक यांनी हे अपार्टमेंट १७.९२ कोटी रुपयांत घेतले आहे. कार पार्किंगसह या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ ३२५८ स्क्वेअर फूट आहे. तर अपार्टमेंटसाठी १.०७ कोटींची स्टँप ड्यूटी त्यांनी दिलीय. या अपार्टमेंटची किंमत ५५ हजार रुपये प्रति स्क्वेअर फूटहून अधिक आहे. (Vivek Agnihotri )

कधीकाळी छप्पराच्या घरात राहत होते विवेक अग्निहोत्री

विवेक अग्निहोत्री यांचे नाव दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांमध्ये होते. विवेक उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील धन्यौरा गावचे रहिवासी आहेत. येथे त्यांचे बालपण गेले. विवेक अग्निहोत्रीचे वडील डॉ. प्रभू दयाल अग्निहोत्री या गावातच आपल्या वडिलोपार्जित घरात राहत होते. नंतर घर विकून ते मुंबईत आले. विवेक अग्निहोत्री धन्यौरामध्ये नाही तर ग्वालियरमध्ये जन्मले.

जाहिरातीतून केली सुरुवात

विवेक अग्निहोत्री यांनी दिल्लीतून मास कम्युनिकेशन आणि एडव्हर्टायझिंगचा कोर्स केला. मुंबईत आल्यानंतर ॲड फिल्ममेकर बनले. ॲड एजन्सीसोबत आपलया करिअरची सुरुवात करणारे काही टीव्ही सीरियल्स दिग्दर्शित केले होते. यादरम्यान, विवेक अग्निहोत्री यांची भेट टीव्ही अभिनेत्री पल्लवी जोशीशी झाली. काही वर्षानंतर दोघांनी लग्न केले.

‘द कश्मीर फाईल्स’मुळे मिळाली ओळख

विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शक म्हणून २००५ मध्ये चित्रपट ‘चॉकलेट’मधून डेब्यू केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. परंतु, ओळख मिळाली ती ‘द कश्मीर फाईल्स’मधून. खूप कमी बजेटमध्ये हा चित्रपट शूट झाला होता. पण, याच चित्रपटाने कोटींची कमाई केली.

Back to top button