5G on Iphone - आयफोनवर ५G सुरू होणार का? एअरटेलचा मोठा खुलासा | पुढारी

5G on Iphone - आयफोनवर ५G सुरू होणार का? एअरटेलचा मोठा खुलासा

आयफोनवर ५G सुरू होणार का? एअरटेलचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन – Apple आयफोन बरेच महाग असतात, त्यामुळे ५जीची सुविधा या फोनवर सुरू झाली नाही तर काय होणार, पुन्हा नवीन फोन घ्यावा लागणार का अशी शंका आयफोन प्रेमींत होती. पण यासंदर्भात एअरटेलने मोठा खुलासा केला आहे. (5G on Iphone)

एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी रणदीप सेखान म्हणाले, “अॅपलने त्यांच्या मोबाईलवर ५जी खुले केलेले नाही. त्यामुळे आयफोनवर सध्या ५जी वापरता येत नाही. पण अॅपल लवकरच त्यांच्या मोबाईलवर ५जी सुरू करणार आहे. अॅपल सध्या भारतात ५जी नेटवर्कची चाचणी घेत आहे. या चाचणीसाठी आम्ही अॅपलला विशेष नेटवर्क देऊ केलेले आहे.”

आयफोन वगळता ५जी सुविधा असलेल्या कोणत्याही मोबाईलवर सध्या एअरटेलची ५जी सुविधा उपलब्ध झाली आहे. रणदीप म्हणाले, “तुम्ही आताही आयफोन १४ घेऊ शकता. पण जोपर्यंत अॅपल स्वतः ५जी सुविधा मोबाईलवर खुली करत नाही, तोपर्यंत तुम्हाला आयफोनवर ५जी वापरता येणार नाही.”

एअरटेल कोणत्याही मोबाईलसाठी सॉफ्टवेअर अपडेट पाठवणार नसून हे अपडेट संबंधित मोबाईल कंपन्यांनी पाठवायचे आहे. तसेच ५जी वापरण्यासाठी नवीन सीमची गरज नाही, असेही ते म्हणाले.
तज्ज्ञांच्या मते आयफोन १२पूर्वीच्या आयफोनवर ५जी सुरू होणार नाही. आयफोन १२, १३, १४ आणि एसई ३ या फोनवर ही सुविधा मिळणार आहे.

हेही वाचा

Back to top button