झी टीव्ही एक चॅनल बंद करणार : ‘हे’ आहे कारण | पुढारी

झी टीव्ही एक चॅनल बंद करणार : 'हे' आहे कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील आघाडीचे टीव्ही चॅनल झी टीव्हीने मनोरंजन क्षेत्रातील त्यांचे एक चॅनल बंद करण्याची तयारी दाखवली आहे. झी आणि सोनी या दोन चॅनलचे विलिनीकरण नियोजित आहे. पण यामुळे टीव्ही चॅनलेच्या क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण होण्याची भीती भारतीय स्पर्धात्मक आयोगाला वाटते. हे लक्षात घेत झी टीव्हीने भारतीय स्पर्धात्मक आयोगाकडे एक मनोरंजन चॅनल बंद करण्याची तयारी दर्शवली आहे. पण झीच्या नियंत्रणातील नेमके कोणते चॅनल बंद केले जाणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

सोनी, झी टीव्ही यांचे विलिनीकरण नियोजित आहे. टीव्ही चॅनल, फिल्म अॅसेट, स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यांचे विलिनीकरण आहे. मनोरंजन क्षेत्रातील हे सर्वांत मोठे विलिनीकरण ठरणार आहे. पण हे विलिनीकरण झाले, तर झी आणि सोनी यांची भारतात एकाधिकारशाही निर्माण होणार आहे, त्यामुळे किंमतीवर पूर्णपणे नियंत्रण येईल त्यामुळे भारतातील मनोरंजन क्षेत्र विस्कळीत होण्याची भीती भारतीय स्पर्धात्मक आयोगाला आहे.

सध्या भारतातील मनोरंजन क्षेत्रात झीचा वाटा २० ते ३० टक्के इतका आहे.

“झी टीव्हीने एक चॅनल बंद करण्याची तयारी दर्शवली आहे. असे केले तर या विलिनीकरणाच्या कक्षेतून हे चॅनल बाहेर पडेल आणि सोनी आणि झी टिव्हीच्या विलिनीकरणातून जी कंपनी तयार होईल, त्याची महत्त्वाच्या विभागांत एकाधिकारशाही तयार होणार नाही,” असे LiveMint ने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

Back to top button