Mahesh babu mother death : साऊथ स्टार महेश बाबू यांना मातृशोक | पुढारी

Mahesh babu mother death : साऊथ स्टार महेश बाबू यांना मातृशोक

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे आज सकाळी निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, महेश यांच्या (Mahesh babu mother death ) आईंना मागील काही दिवसांपासून तब्येतीचा त्रास होता. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात महेश बाबू यांच्या आईवर उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने महेशच्या आईला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण, २८ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Mahesh babu mother death )

सतीश रेडी यांनी आपल्या ट्विटरवर ही दु:खद बातमी शेअर केली आहे. महेश बाबू यांच्या आईंच्या निधनाची माहिती देताना सतीश रेड्डी यांनी लिहिलं की, सुपरस्टार महेश बाबू यांची आई इंदिरा गुरु यांचे निधन झाले. त्यांच्या परिवाराप्रती माझ्या संवेदना. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

Back to top button