पिंपरी : अतिरिक्त आयुक्तांकडील विभागांचा भार कमी केला

पिंपरी : अतिरिक्त आयुक्तांकडील विभागांचा भार कमी केला
Published on
Updated on

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (क्रमांक एक) नुकतेच प्रदीप जांभळे रूजू झाले असून, त्यांच्याकडील विभागांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर, महत्त्वाचे विभाग अतिरिक्त आयुक्त (क्रमांक दोन) जितेंद्र वाघ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी तीन अतिरिक्त आयुक्तांच्या विभागाची फेररचना केली आहे.

आयुक्त सिंह यांनी स्वत:कडे लेखा, विशेष प्रकल्प (अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएम), नगररचना, दक्षता व गुण नियंत्रण हे विभाग ठेवले आहेत. अतिरिक्त आयुक्त वाघ यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना, निवडणूक व जनगणना, भूमि आणि जिंदगी, पर्यावरण अभियांत्रिकी़ हे विभाग होते. त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (क्रमांक) विकास ढाकणे यांच्याकडे असलेले प्रशासन, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, क्रीडा, स्थापत्य प्रकल्प, स्थापत्य मुख्य कार्यालय, वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, आरोग्य, पशुवैद्यकीय (बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय), माहिती व तंत्रज्ञान या विभागांचीही जबाबदारी देण्यात आली आहे.

तर, नवखे असलेल्या अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्याकडे उद्यान व वृत्तसंवर्धन, अग्निशामक, शिक्षण, स्थापत्य (उद्यान), माध्यमिक शिक्षण मुख्य कार्यालय, कायदा, कामगार कल्याण, अतिक्रमण, स्थानिक संस्था कर, बीआरटीएस प्रकल्प, विद्युत मुख्य कार्यालय, करसंकलन मुख्य कार्यालय, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्रमांक 23, मध्यवर्ती भांडार हे विभाग देण्यात आले आहेत.

तर, नगरसचिव तथा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे सुरक्षा, समाज विकास, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, झोनिपु, आयटीआय (मोरवाडी, कासारवाडी), नागरी सुविधा केंद्र, अभिलेख कक्ष, बीसीयूपी, ईडब्ल्यूएस प्रकल्प, झोनिपु स्थापत्य, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहांसह), आपत्ती व्यवस्थापन हे विभाग आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news