Sonalee Kulkarni : डीप नेक ड्रेसमध्ये ‘लाल परी झकास’

 Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni

पुढारी ऑनलाईन डेस्क : नटरंगची 'अप्सरा' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या नव्या फोटोशूटने सर्वांनाच घायाळ केलंय. लाल-डार्क पिंक कलरच्या वनपीस ड्रेसने सोनालीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. खास म्हणजे, तिचा हार्ट शेप असलेला डीप नेक ड्रेस (Sonalee Kulkarni ) नजरेत भरणारा आहे. तिचे सौंदर्य तर लाजवाब आहे. आपल्या अदाकारीने नेहमीच या अभिनेत्रीने आपला चाहता वर्ग वाढवला आहे. या फोटोशूटमध्ये तिने दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ केले आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटोज शेअर केले आहेत. शिवाय आणखी काही निवडक सुंदर फोटोही पाहायला मिळतात. काही फोटोंना चाहत्यांनी Queen of my ❤️, So pretty?, लाल परी disat sonalee tai ❤️, Soo Beautiful ?, सुंदर & झकास !, khup sunder disat sonalee tai ❤️, लाल परी झकास, Sunnnnndarrrrrrr❤️, Beautiful❤❤ , aai gaaa❤️, Gorgeous Beauty ?, Very beautiful and elegant, मराठी Queen ?❤️, खूपच छान म्हणत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. (Sonalee Kulkarni)

सोनाली सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे लूक शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या बालपणीचेही फोटो शेअर केले आहेत. आणखी काही फोटोंमध्ये ती पंजाबी लूकमध्ये दिसते. तर काही फोटोंमध्ये ती मराठमोळ्या लूकमध्ये दिसते. ती एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. ती सध्या डान्स महाराष्ट्रा डान्स या टीव्ही शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे.

सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय. या लूकमध्ये ती लाल रंगाच्या वनपीस ड्रेसमध्ये दिसतेय. शोभेल असा मेकअप, हेअरस्टाईल आणि मोहून टाकणाऱ्या अदांमुळे सोनाली पाहून व्वा क्या बात हैं अशी कमेंट आपसूकचं तोंडातून निघते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news