Ananya Birla : उद्योगपतीच्या कन्येचे बॉलीवूड पदार्पण | पुढारी

Ananya Birla : उद्योगपतीच्या कन्येचे बॉलीवूड पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक कुणाल कोहली आता ‘श्‍लोक ः द देसी शेरलॉक’ हा चित्रपट बनवत आहे. यात बॉबी देओल देसी शेरलॉकच्या रूपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून अनन्या बिर्ला बॉलीवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. अनन्या ही बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आणि नीरजा या दाम्पत्याची कन्या आहे. तिने गायकीतून तिच्या करिअरची सुरुवात केली आहे. ती इलेक्ट्रो पॉप आणि पॉप या जॉनरची गाणी गाते. याशिवाय सेएन किंग्स्टन आणि एफ्रॉॅजॅक या गायकांसोबत तिने कोलॅबेट केले आहे.

 

Back to top button