Brahmastra : ब्रह्मास्त्र हिट का फ्लॉप? काय ४०० कोटी पाण्यात गेले? | पुढारी

Brahmastra : ब्रह्मास्त्र हिट का फ्लॉप? काय ४०० कोटी पाण्यात गेले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीचा ब्रह्मास्त्र हा महत्वाकांक्षी चित्रपट हिट होणार का फ्लॉप याकडे बॉलीवूडचं लक्ष लागलेलं आहे. आज शुक्रवारी म्हणजेच ९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवण्यात आली होती. ‘चित्रपटावर बहिष्कार घाला’ (Brahmastra ) अशी मागणी केली जात होती. नेपोटीझम (घराणेशाही), वादग्रस्त विधाने यावरून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीला वारंवार लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणार का याकडे बॉलीवूडप्रेमींचे लक्ष लागले आहे. चित्रपट समीक्षकांनी चित्रपट पाहून त्यांची मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबत काय म्हटलंय ते पाहा- (Brahmastra )

तरण आदर्श यांच्या मते हा चित्रपट निराश करणारा आहे. ५ स्टारपैकी आदर्श यांनी या चित्रपटाला २ स्टार दिले आहेत. चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय की, ‘चित्रपटाने घोर निराशा केली आहे. व्हीएफएक्स चांगले असले तरी कथानक कमजोर आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध तर अधिकच निराश करणारा आहे. ब्रम्हास्त्र हा चित्रपट गेमचेंजर ठरला असता, मात्र या चित्रपटाने ही संधी गमावली आहे. चित्रपट चकचकीत आहे मात्र पोकळ आहे.’

या चित्रपटाची घोषणा २०१४ साली करण्यात आली होती. विविध कारणांमुळे हा चित्रपट पुढे ढकलला गेला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही भूमिका असून शाहरूख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. अशी तगडी स्टारकास्ट असतानाही समीक्षकांनी या चित्रपटाला निराश करणारा म्हणणे हे चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी चिंतेची बाब आहे.

जवळपास ९ हजार स्क्रीनवर रिलीज

चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी सांगितलं की, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट ब्रह्मास्त्र जगभरात ८ हजार ९१३ स्क्रीनसोबत रिलीज झाला. चित्रपटाला भारतात ९ हजार स्क्रीनवर रिलीज करण्यात आलं आहे.

चित्रपटात कलाकारांची फौज 

रणबीर कपूर-आलिया शिवाय अमिताभ बच्चन, चिरंजीवी, नागार्जून, आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी दावा केला की, हा एक ओरिजिनल बॉलीवूड चित्रपट आहे, जो अनेक भारतीय भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

४०० कोटी पाण्यात गेले? 

यावेळी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सटकून आपटले आहेत, असं म्हटलं जात आहे की, ४०० कोटींहून अधिक बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवेल. पण, समीक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर, बायकॉटचा ट्रेंडचा परिणामदेखील या चित्रपटावर होऊ शकतो.

Back to top button