Shubman Gill-Sara Ali Khan च्या नात्याला मित्राने दिला दुजोरा?

shubman gill and sara ali khan
shubman gill and sara ali khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड आणि क्रिकेट जगताचे नाते खूप घट्ट आहे. चित्रपट जगत आणि क्रीडा विश्वातून कोणाच्या ना कोणाला डेट करण्याच्या बातम्या येत असतात. अलीकडे अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill-Sara Ali Khan ) यांच्या डेटिंगच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. दोघांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. सारा अली खान आणि शुभमन गिलच्या डेटिंगच्या बातम्यांना सध्या अधिकच वेग आला आहे. कारण शुभमन गिलच्या मित्राची पोस्ट त्यांच्या नात्यासंदर्भात सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. (Shubman Gill-Sara Ali Khan )

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. परंतु काही दिवसांपूर्वी साराचा क्रिकेटर शुभमन गिलसोबतचा फोटो समोर आल्यानंतर हे दोघे एकत्र आहेत, यावर सर्वांचा विश्वास बसू लागला होता. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सारा आणि शुभमन एकत्र डिनर करताना दिसत होते. हा फोटो दुबईचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना वेग आला.

क्रिकेटरचा मित्र खुशप्रीत सिंग औलख याने सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरबाबत मोठा इशारा दिला आहे. वास्तविक, शुभमन गिलने आपला वाढदिवस साजरा केला होता. या प्रसंगी, शुभमन गिलच्या मित्राने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले,, 'माय मेन मॅन, द ओजी, एनॉयिंग और गूगल ग्रॅज्युएटेड बेबीला जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा. पण, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझं जीवन तुझ्याविना अपूर्ण आहे…मला आशा आहे की परमेश्वर आपणास अधिक यश देवो. गूगल ज्ञान आणि खूप 'सारा' प्रेम @shubmangill".

शुभमन गिलच्या मित्राने आपल्या पोस्टमध्ये ज्या प्रकारे 'सारा' हा शब्द लिहिला आहे, त्यावरून चाहत्यांचा असा विश्वास आहे की, येथे अभिनेत्री सारा अली खानबद्दल बोलले जात आहे. शुभमन गिलच्या मित्राची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे आता शुभमन आणि साराच्या प्रेमप्रकरणाच्या अफवा आणखी वाढू लागल्या आहेत.

याआधी शुभमन गिलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले होते. परंतु दोघांनीही याबद्दल कधीच सांगितले नाही. यासोबतच सारा अली खानबद्दल बोलायचे झाले तर सारा कार्तिक आर्यनला डेट करत असल्याची चर्चा समोर येत होती. अलीकडेच सारा साऊथ अभिनेता विजय देवराकोंडा याला डेट करत असल्याची चर्चा होती, मात्र आता सारा आणि शुभमनच्या डेटींगच्या बातम्यांनी जोर पकडला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news