Bhadang : १० मिनिटांत झणझणीत कोल्हापुरी भडंग कसे कराल?

Bhadang : १० मिनिटांत झणझणीत कोल्हापुरी भडंग कशी कराल?
Bhadang : १० मिनिटांत झणझणीत कोल्हापुरी भडंग कशी कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : झटपट आणि झणझणीत कोल्हापुरी भडंग (Bhadang) महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लोकांना चहाबरोबर भडंग खायला नक्कीच आवडतं. प्रवासात, मुक्कामाच्या ठिकाणी जास्त काळ टिकणारा पदार्थ म्हणजे भडंग. महाराष्ट्रीय लोकांचा महत्वाचा खाद्यपदार्थ असून अवघ्या १० मिनिटांत हा पदार्थ करता येतो. चला तर, आज आपण कोल्हापुरी झणझणीत कोल्हापुरी भडंग करून पाहू या…

साहित्य

१) पाव किलो चिरमुरे

२) तीन टेबलस्पून पिठीसाखर

३) दोन चमचे ताल तिखट

४) दहा ते बारा पाकळ्या लसूण

५) दोन इंच आलं बारीक चिरून

६) दोन चमचे जिरे

७) दोन चमचे मोहरी

८) कढीपत्त्याची २०-२५ पानं,

९) एक वाटी शेंगदाणे, बारीक कापलेली मिरची

१०) एक वाटी खिसलेलं सुखे खोबरे

११) एक वाटी कुडलेली कोथिंबीर

१२) पदार्थ तळता येतील इतकं तेल आणि चवीनुसार मीठ

कृती 

१) एका मोठ्या भांड्यात चिरमुरे घ्या. जेणे करून नंतर त्यात इतर पदार्थ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करता येतील.

२) मध्यम गॅसवर पॅन ठेवून सुखं खोबरं सोनेरी रंग प्राप्त होईपर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात काढून घ्या.

३) गॅसवर कढई ठेवून तेल गरम करा. त्यानंतर त्यात शेंगदाणे टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. नंतर ते शेंगदाणे चिरमुऱ्यावर घालून घ्या.

४) त्यानंतर कढईतील तेलातच आलं, लसूण, कढीपत्त्याची पानं, कोथिंबरी, कापलेल्या मिरच्या, असं एकत्रितपणे तळून घ्या. तळून झाल्यानंतर ते सर्व चिरमुऱ्यावर घालून घ्या.

५) पुन्हा भाजलेलं खोबरं तेलात टाकून तळून घ्या. ते तळलेलं खोबरं काढून चिरमुऱ्यामध्ये घालून घ्या. त्याचबरोबर चिरमुऱ्यामध्ये कोल्हापुरी तिखट, चवीनुसार मीठ आणि पिठी साखर टाकून घ्या.

६) आता कढईतील उरलेल्या तेलात जिरे, मोहरी आणि एक चमचा हळद घाला आणि चांगलं तळून घ्या. कढईतील सर्व तेल आणि इतर जिन्नस चिरमुऱ्यामध्ये टाकून घ्या.

७) हे सगळे तळलेले पदार्थ चिरमुऱ्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थिपपणे चिरमुरे मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने तुमची झणझणीत कोल्हापुरी भडंग तयार झाली.

नंतर एका प्लेटमध्ये भडंग काढून त्यावर कोथिंबरी टाकून घ्या. लिंबूच्या दोन चिरलेल्या फोडी, आणि तळलेल्या मीठ लावलेल्या दोन मिरच्या, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाका… मस्तच टेस्टी आणि खमंग भडंग (Bhadang) तयार झाली आहे.

टीप : सर्व पदार्थ तुम्ही तेला तळून चिरमुऱ्यामध्ये टाकले की, भडंगाला कोल्हापुरी चव प्राप्त होते. जर, तुम्हाला आणखी तिखट हवं असेल तर, भडंगामध्ये पुन्हा थोडं तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

पहा व्हिडीओ : चटकदार लोणच्याची रेपिसी एकदा करून बघाच…

या रेसिपीज वाचल्यात का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news