Taliban Crisis : अज्ञात अखुंदजादा होणार अफगाणिस्तानचा नवा पंतप्रधान | पुढारी

Taliban Crisis : अज्ञात अखुंदजादा होणार अफगाणिस्तानचा नवा पंतप्रधान

काबूल, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानात सत्तेसाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात तालिबानने (Taliban Crisis) मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याला सर्वोच्च नेता जाहीर केला आहे. तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देश चालवणार असल्याचे म्हंटलेले आहे. त्यामुळे कधीही जगासमोर न आलेले अखुंदजादा अफगाणिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत.

तालिबानच्या (Taliban Crisis) सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनामुल्ला समांगनी म्हणाले की, “मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हे देखील नवीन सरकारचे नेते असतील. तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझाई यांचा हवाला देत म्हंटले आहे की, इस्लामिक अमीरात येत्या दोन दिवसांत आपले नवीन सरकार जाहीर करेल.

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार तालिबान इराण मॉडेलनुसार सरकार स्थापन करीत आहे. यात इस्लामी प्रजासत्ताक असेल जिथे सर्वोच्च नेते राज्याचे प्रमुख असतील. ते सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय व्यक्ती देखील असतील.

अनामुल्ला समांगनी म्हणाले की, “नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा जवळजवळ संपली आहे आणि मंत्रिमंडळाबद्दल आवश्यक चर्चा झाली आहे. आम्ही जाहीर करू ते इस्लामी सरकार लोकांसाठी आदर्श असेल. सरकारमध्ये कमांडर (अखुंदजादा) यांच्या उपस्थितीबद्दल शंका नाही. ते सरकारचे नेते असतील आणि याबाबत कोणताच प्रश्न उद्धवू नये”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button