धक्कादायक! बिग बाॅस विजेता अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं निधन | पुढारी

धक्कादायक! बिग बाॅस विजेता अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं निधन

पुढारी ऑनलाईन : अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं वयाच्या ४० व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. सिध्दार्थ शुक्ला हा बिग बाॅसच्या १३ चा विजेता होता. मुंबईतील कूपर रुग्णालयात गुरुवारी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला.

अधिक वाचा- 

धक्कादायक! बिग बाॅस विजेता अभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचं निधन

‘धक् धक् गर्ल’ माधुरी दीक्षितच्या हस्ते प्लॅनेट मराठी ओटीटी ॲप लाँच

sidharth

१२ डिसेंबर, १९८० रोजी त्याचा जन्म झाला होता. बालिका वधू, दिल से दिल तक अशा मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. हम्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ब्रोकन बट ब्युटिफुल या वेब सीरीजमध्ये काम केलं होतं. त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काहीतरी औषधे घेतली होती. परंतु, तो त्यानंतर उठला नाही. रुग्णालयाने नंतर पुष्टी केली की, सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाली आहे.

अधिक वाचा-

आश्रम फेम त्रिधा चौधरी हिचे बोल्ड व्हिडिओ व्हायरल…

आई कुठे काय करते; ‘न घर का ना घाट का’ अशी झाली संजनाची अवस्था

टीव्ही इंडस्ट्रीतील मोठे नाव म्हणजे सिध्दार्थ. त्याने रिॲलिटी शो बिग बॉसचा १३ वा सीझन जिंकला होता. त्याशिवाय त्याने खतरों के खिलाडीचा ७ वा सीझनदेखील आपल्या नावे केला होता. मालिका बालिका वधूतून सिद्धार्थ घराघरात पोहोचला.

अधिक वाचा-

कंगना राणावत वरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला!

जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट ‘या’ दिवशी भारतात होणार प्रदर्शित

‘मी जग सोडून जातोय,’; मुलाला फोन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

Back to top button