Sakshi Malik : साक्षीचा आजपर्यंतचा असा बोल्ड अवतार पाहिला नसेल

sakshi malik
sakshi malik

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री साक्षी मलिकने रिविलींग ड्रेसमध्ये हॉटनेसचा तडका लावलाय. (Sakshi Malik ) बोल्डनेसच्या बाबतीत तिने सर्वांना मागे टाकलं आहे. बॅकलेस मिनी ड्रेसमध्ये साक्षी खूप बोल्ड दिसतेय. साक्षीने पुन्हा एकदा आपल्या लूकने सर्वांना इम्प्रेस केलं आहे. कॅमेराच्या समोर साक्षीने कातिलाना अदा दाखवल्या आहेत. आतापर्यंतचा तिचा सर्वात बोल्ड अवतार आहे, असे म्हटले तरी हरकत नाही. ॲक्टिंग आणि डान्सिंगसाठी ही अभिनेत्री प्रसिद्ध आहे. साक्षीला ६.९ मिलियन लोक इन्स्टावर फॉलो करतात. (Sakshi Malik )

साक्षी मलिक ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे, जी सोनू के टीटू की स्वीटी चित्रपटातील "बॉम डिग्गी डिग्गी" या गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. साक्षी मलिक भलेही चित्रपटांपासून दूर असेल. पण सोशल मीडियावर ती मागे नाही. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो तिने शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. साक्षी मलिक इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आणि मॉडेलिंग करताना बॉलिवूडमध्ये पोहोचली.

दरम्यान, ती व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी इटलीत गेली होती. अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आणि कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट्सचा पाऊस पडला. चाहते तिला फायर इमोजी आणि रेड हार्ट इमोजी टाकत आहेत. अभिनेत्री साक्षी मलिकने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट बिकिनी फोटो शेअर केला आहे.

साक्षी मलिकने सुरुवातीला इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले होते. ज्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या. आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या साक्षी मलिकने दिल्लीतून बी. टेक. केले. तिला एमबीए करण्याची इच्छा होती. पण ती मॉडेलिंगमध्ये आली. साक्षी मलिकने तिच्या छोट्या मॉडेलिंग करिअरमध्ये एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडशिवाय इतर अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे. या जाहिरातींमधून साक्षी खूप प्रसिद्ध चेहरा बनली. सुरुवातीला साक्षी मलिकला चित्रपट न करता मॉडेलिंग करायचे होते, पण नंतर मॉडेलिंगच्या दुनियेत यशस्वी झाल्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news