कोल्‍हापूर : हुपरीत शिवसेना भवनाच्या प्रतिकृतीत ‘श्रीं’ची प्रतिष्ठापणा | पुढारी

कोल्‍हापूर : हुपरीत शिवसेना भवनाच्या प्रतिकृतीत 'श्रीं'ची प्रतिष्ठापणा

हुपरी; अमजद नदाफ : सध्या राज्यात ठाकरे – शिंदे गटात सुरू असणाऱ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर जो तो आपलाच गट अधिकृत असल्याचा दावा करीत आहे. असे असताना हुपरी येथील सचिन शिंदे, संदिप शिंदे या शिवसैनिक बंधूंनी आपल्या घरी चक्क शिवसेना भवनाची प्रतिकृती उभारून त्यात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. त्‍यांनी साकारलेली ही आरास लक्षवेधी ठरत आहे.

शिवसेनेतील आमदारांना फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे. शिवसेनेतील या बंडाळीमुळे देशात खळबळ उडाली. मात्र हुपरीतील शिवसैनिक व  शिंदे बंधूंनी आपली शिवसेना पक्षाशी नाळ किती मजबूत आहे. हे दाखवून दिले आहे. शिवसेना भवनाची अगदी हुबेहूब व सुंदर प्रतिकृती उभारून शिंदे बंधूंनी त्यात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली.

ती लक्षवेधी ठरली आहे. संदिप शिंदे यानी ही कल्पकता वापरून ही प्रतिकृती उभारली आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांची शिवसेनेशी असलेले नाते किती दृढ आहे हे यातून प्रतीत होते. सध्याच्या राजकारणात शिवसेना आणि शिंदे गटातील सुरू असलेल्‍या कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही आरास लक्षवेधी ठरत आहे.

हेही वाचा : 

Back to top button