#BoycottBrahmastra : ‘मला बीफ खाणं खूप आवडंत’, रणबीरचा जुन्या व्हिडिओवर टिकेचा भडीमार

Brahmastra
Brahmastra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावरील बायकॉट बॉलिवूड (#BoycottBrahmastra) नंतर रिलीज होणाऱ्या प्रत्येक हिंदी चित्रपटांवर नेटिझन्सनी बहिष्कार घातला. यामध्ये रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील समाविष्ट आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या चित्रपटाचे प्रमोशन करत असतानाच अनेकवेळा नेटकऱ्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घातला. ट्विटरवर बायकॉट ब्रह्मास्त्रचा ट्रेंड होऊ लागला. आता नेटकऱ्यांना हा चित्रपट बायकॉट करण्यासाठी आणखी एक नवे कारण मिळाले आहे. रणबीरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपले आवडत्या बीफ विषयी बोलताना दिसतोय. (#BoycottBrahmastra)

हा रणबीरचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रॉकस्टार चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. व्हिडिओत तो मुलाखत देताना दिसतोय. यामध्ये तो मला बीफ खूप आवडतं असं म्हणताना दिसतोय.

ट्विटरवर एकापेक्षा अधिक वेळा #BoycottBrahmastra हा ट्रेंड सुरू होता. त्यावर अनेक मीम्सदेखील व्हायरल झाले. तर रणबीरवर टीकाही करण्यात आली. 'रणवीर बीफ खाता है, यही ब्रह्मास्त्र का हिरो है', "Must boycott this beef guy," असंही नेटकऱ्यांनी लिहिलेलं दिसतं.

तर काही नेटकऱ्यांनी रणबीरचे समर्थन केले आहे. काहींनी असा युक्तिवाद केला की, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे कारण नाही. एका युजरने ट्विट केले की, "त्याला काय खायचे आहे की नाही हा त्याचा निर्णय आहे. रणबीरच्या समर्थनार्थ दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले- "किमान तो आमच्या इतिहासावर चित्रपट बनवण्यासाठी काहीतरी करत आहे."

काही नेटिझन्सनी आलियाच्या मुलाखतीची एक क्लिपदेखील व्हायरल केलीय. ज्यामध्ये ती म्हणताना दिसतेय की, जर एखाद्याला आवडत नसेल तर तिचे चित्रपट पाहू नका. इतकचं नाही तर राणा अयूबसोबत आलिया भट्टचा फोटो, अमिताभ बच्चन यांचे घूंघटवरील प्रश्ने, PK चित्रपटात भगवानचे स्टिकर लावणे, महेश भट्ट यांचे २६/११ च्या हल्ल्यात हिंदूंना दोषी म्हणणे, पूजा भट्टचा ॲन्टी हिन्दू चित्रपट असे विषय समोर आणत ब्रह्मास्त्रमध्ये काम करणाऱे जितके सेलेब्स आहेत, त्यांचा इतिहास चाळण्यात आला. त्यांते वादग्रत, अनैतिक आणि ॲन्टी हिंदू स्टेटमेंटवरून #BoycottBrahmastra चा ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news