Zeishan Quadri: ‘गँग्स ऑफ वासेपूर’ अभिनेता जीशान विरोधात एफआयआर | पुढारी

Zeishan Quadri: 'गँग्स ऑफ वासेपूर' अभिनेता जीशान विरोधात एफआयआर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’चा अभिनेता आणि लेखक जीशान कादरी (Zeishan Quadri) कायदेशीर अडचणीत सापडला आहे. मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात जिशानविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. चित्रपट फायनान्सर आणि निर्माती शालिनी चौधरी यांनी हा एफआयआर दाखल केला आहे.  (Zeishan Quadri)

जीशानने १२ लाखांना विकली ऑडी कार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी चौधरी यांनी आरोप केला आहे की, सोनी टीव्हीच्या एका खास कार्यक्रमासाठी जीशान तिच्याशी बोलले होते. यानंतर जीशानने शालिनीची ऑडी कार वापरण्यास सुरुवात केली. नंतर जीशानने शालिनीच्या कॉलला उत्तर देणे बंद केले. नंतर शालिनीला कळले की जीशानने तिची महागडी ऑडी कार अवघ्या १२ लाख रुपयांना विकली.

शालिनीला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आणि तिची मंजुरी न घेता तिची महागडी कार विकल्याबद्दल जीशानला नंतर अटक करण्यात आली. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना शालिनी म्हणाली, ‘जीशान कादरीसोबत माझी पहिली भेट २०१७ मध्ये झाली होती. तो सोनीसाठी क्राईम पेट्रोलची निर्मिती करत असल्याने त्याला पैशांची गरज होती. त्यांची तथाकथित पत्नी श्रीमती प्रियांका बस्सी यादेखील व्यवसायात भागीदार होत्या. क्राईम पेट्रोलशिवाय आम्ही ‘हलाहल’ चित्रपटातही पैसे गुंतवले. त्यानंतर माझा जीशानवर थोडा विश्वास बसू लागला.

जिशानला जीवे मारण्याची धमकी?

ऑडी कार घेतल्यानंतर जीशान कादरी आणि प्रियांकाने तिचे फोन घेणे बंद केल्याचा आरोप शालिनीने केला आहे. नंतर त्याला कळले की जीशानने आपली ऑडी बनावट कागद बनवून १२ लाख रुपयांना विकली होती. याबाबत शालिनीने त्याला विचारणा केली असता, जीशानने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. शालिनीचा दावा आहे की, जीशानने तिला एफआयआर नोंदवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. शालिनीने असेही सांगितले की, जीशानच्या वकिलानेही तिला सेटलमेंट करण्यास सांगितले होते.

Back to top button