पिंपरी : कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक | पुढारी

पिंपरी : कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एकाची 45 हजार 525 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 सप्टेंबर 2020 रोजी रात्री काळभोरनगर येथे घडली. याप्रकरणी ब्रेन्डेन क्रिस्टो रॉड्रिक्स (26, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी गुरुवारी (दि. 25) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मासे खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला गुगल पे द्वारे पैसे पाठवले. मात्र, मासे विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. याबाबत तक्रार करण्यासाठी फिर्यादी यांनी गुगलवर असलेल्या कस्टमर केअरच्या क्रमांकावर फोन केला. त्यावेळी आरोपीने पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांना बोलण्यात गुंतवले. तसेच, फिर्यादी यांना गुगल पेवर काही आकडे आणि मेसेज टाईप करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांच्या खात्यातून 45 हजार 525 रुपये काढून फसवणूक केली.

Back to top button