Liger Collection : विजय देवरकोंडाचा लायगर किती फ्लॉप ठरला? | पुढारी

Liger Collection : विजय देवरकोंडाचा लायगर किती फ्लॉप ठरला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार विजय देवरकोंडाचा चित्रपट ‘लायगर’ चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. हिंदीसोबत हा तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज केला जाईल. (Liger Collection) आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनदेखील समोर आले आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथचा ‘लायगर’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. यामेध्ये विजय देवरकोंडाने एका बॉक्सरची भूमिका साकारलीय. विजयची भूमिका लायगर बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन आहे. पण, तो बोलताना अडखळतो. चित्रपटात अनन्या पांडे, लायगरची प्रेयसी तान्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातून विजय देवरकोंडाने बॉलीवूड डेब्यू केलं आहे. (Liger Collection)

लायगरची कमाई? 

लायगर हा चित्रपट बॉलीवूडमधील बॉक्स ऑफिसवरील संकट दूर करेल, अशा अपेक्षा होत्या. विजय देवरकोंडाची लोकप्रियता पाहता असं मानलं जात होतं की, संपूर्ण भारतात हा चित्रपट धुमाकूळ घालणार आहे. एकूण अडीच हजार स्क्रिनस्वर रिलीज करण्यात आले आहे.

समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर प्रेक्षकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, जगभरात या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३३.१२ कोटींची कमाई केली आहे. भारतात सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने २१ ते २३ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. तेलुगू व्हर्जनने सर्वात अधिक कमाई केल्याचे म्हटले जात आहे.

विजय देवरकोंडा स्टारर ‘लायगर’ मध्ये राम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. इंटरनॅशनल बॉक्सर माईक टायसनने या चित्रपटामध्ये कॅमियो केला आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

Back to top button