शिर्डी : साई मंदिरात हारफुलें नेण्याचा वाद पेटला; सुरक्षा रक्षक विक्रेत्यांमध्ये धुमश्चक्री (Video) | पुढारी

शिर्डी : साई मंदिरात हारफुलें नेण्याचा वाद पेटला; सुरक्षा रक्षक विक्रेत्यांमध्ये धुमश्चक्री (Video)

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा: बंद करा बंद करा हुकुमशाही बंद करा चा नारा देत, आज शिर्डी मधील साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या हारफुलें विक्रते आणि सुरक्षारक्षकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली. साई मंदिर प्रशासनाने भाविकांना साई मंदिरात हार फुले आणि प्रसाद घेऊन जाण्यास बंदी केल्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून शिर्डीमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. साई मंदिरात हार फुल प्रसाद याच्यावर बंदी उठवावी यासाठी आज हार फुले विक्रेत्यांनी साई मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवल्यामुळे सुरक्षारक्षक आणि व्यवसायांमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडालेली पाहायला मिळाली. शिर्डी मधील ग्रामस्थ दिगंबर कोते हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले असून, साई मंदिरात हार फुले आणि प्रसाद मिळवून द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तर आज सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हे सुद्धा शिर्डीत दाखल झाले आहेत.

शिर्डीत मंदिर परिसरातील वातावरण सध्या तणावग्रस्त बनले असून, शिर्डी संस्थाने हा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. प्रशासनाने स्थानिक आमदार, खासदार यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे असतानाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.

 

 

Back to top button