‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणचा ‘राडा’ मध्ये रावडी लूक | पुढारी

'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाणचा 'राडा' मध्ये रावडी लूक

पुढारी ऑनलाईन : ‘राडा’ चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले आहे. फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडीसोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या या ‘राडा’ चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांची वाहवा मिळवली. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण हीने मुख्य भूमिका साकारली आहे. योगिता ‘राडा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे.

राम शेट्टी निर्मित ‘राडा’ या चित्रपटात योगिता मुख्य भूमिकेत दिसणार असून तिचा रावडी आणि मितभाषी असे दोन्ही लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात योगिताचा लव्हेबल अंदाजही चाहत्याना विशेष भावणार आहे. तर योगिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प – पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या हा भव्यदिव्य ‘राडा’ या अॅक्शनपट पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले केले असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना यांनी पेलली आहे.

गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा भव्य अॅक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या चित्रपटात योगितासोबत आणखी कोणते कलाकार दिसणार, हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे. येत्या २३ सप्टेंबरला ‘राडा’ चित्रपट रिलीज होणार आहे. यामुळे या चित्रपटातून योगिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button