Jacqueline rebuts ED : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ‘ईडी’वर गंभीर आरोप, म्‍हणाली “नोराला साक्षीदार…” | पुढारी

Jacqueline rebuts ED : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा 'ईडी'वर गंभीर आरोप, म्‍हणाली "नोराला साक्षीदार..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याने केलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला आरोपी बनविले होते. आता या कारवाईबाबत जॅनलिनने मौन सोडले आहे. ( Jacqueline rebuts ED )  आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्‍याकडून भेटवस्‍तू घेणार्‍या अन्‍य व्‍यक्‍तींना साक्षीदार बनविण्‍यात आले तर आपल्‍याला आरोप बनविण्‍यात आल्‍याचा आरोप तिने केला आहे.

Jacqueline rebuts ED : ‘ईडी’ने माझ्‍याबाबतीत भेदभाव केला

यासंदर्भात जॅकलिनने अपीलकर्ता प्राधिकरणासमोर याचिका दाखल केली आहे. यामध्‍ये तिने म्‍हटले आहे की, “मी नेहमीच चौकशी संस्‍थेला सहकार्य केले. मला समन्‍स बजावण्‍यात आल्‍यानंतर मी चौकशीलाही सामोरे गेले. माझ्‍याकडे असणारी सर्व माहिती मी दिली. मात्र ‘ईडी’ने माझ्‍याबाबतीत भेदभाव केला आहे. मला सुकेश चंद्रशेखरने फसवले. त्‍याचप्रमाणे मॉडेल नोरा फतेही हिलही त्‍याने फसवले होते. तसेच सुकेश याच्‍याकडून अनेक जणांना भेटवस्‍तू मिळाला. त्‍यांना ईडीने साक्षीदार केले तर मला आरोप केले आहे. यावरुनच ईडीचा पक्षपातीपणा स्‍पष्‍ट होतो. याकडे नाकाडोळा करता येणार नाही.” ( Jacqueline)

सुकेशवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये 32 गुन्हे दाखल

न्यायालयाने याआधीच जॅकलिनला देश सोडून कुठेही जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत. सुकेश चंद्रशेखर गुन्हेगार असल्याचे जॅकलिनला माहित होते आणि लुटीच्या पैशाचा तिला फायदा झाल्याचे ईडीचे आरोपपत्रात नमूद केले आहे. दिल्लीतील तिहार तसेच इतर तुरुंगात बसून सुकेश चंद्रशेखर आपले वसुलीचे रॅकेट चालवित होता. सदर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिची ईडीकडून अनेकदा चौकशी झाली आहे. सुकेशने जॅकलिनला सुमारे दहा कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. दुसरीकडे सुकेशवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये 32 गुन्हे दाखल आहेत. ईडी, सीबीआय, आयकर खात्याकडून सुकेशची विविध घोटाळ्यांच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button