मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पीएम मोदींकडे विनंती | पुढारी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पीएम मोदींकडे विनंती

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीने जोर धरल्यानंतर काही वर्षांपूर्वी प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. मात्र, जवळपास अडीच हजार वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. मराठीच्या अभिजात भाषेचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे धूळखात पडून आहे. प्रलंबित प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पंतप्रधांनांना दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button