Vivek Agnihotri : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर साधला निशाणा म्हणाले, "जसे दिसतं तसे ..." | पुढारी

Vivek Agnihotri : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर साधला निशाणा म्हणाले, "जसे दिसतं तसे ..."

पुढारी ऑनलाईन डेस्क: ‘द काश्मिर फाईल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri ) पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय होत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. मध्यंतरी विवेक अग्निहोत्री सोशल मीडियापासून दूर होते. आज पुन्हा एकदा त्‍यांनी बॉलिवूडविरूद्ध एक पोस्ट शेअर केली. बॉलिवूडमध्ये ‘जसे दिसतं तसे अजिबात नसतं’ असे म्हणत बॉलिवूडचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नुकतेच त्याच्या ट्विटर अकाउंटवर ‘बॉलिवूड्स इनसाईड स्टोरी कृपया वाचा’ असे लिहित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी बॉलिवूडचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर खूपच जोरदार व्हायरल होत आहे.

येथे अपमान आणि शोषणाला नेहमी सामोरे जावे लागते

विवेक अग्निहोत्री यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘बॉलिवुडमध्ये जे दिसतं ते सगळंच खरं आहे असे होत नाही. काहीवेळा ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही असाही काही गोष्टी येथे घडत असतात. या गोष्टी मला स्वत:ला समजून घेण्यासाठी बराच काळ क्षेत्रात घालवावा लागला. तुमच्या पुढे जे बॉलिवूडचे चित्र उभे केले जाते ते खोटे असते. बॉलिवूडचा काळा चेहरा कल्पनेपलीकडेचा आहे. यांचा तुम्हाला अंदाजही लावता येणार नाही. या अंधारलेल्या बॉलिवूडच्या जगात तुटलेली, विस्कटलेली आणि गाडलेली स्वप्नेच दिसतात. बॉलिवूड एक टेलेंटचं संग्रहालय आहे तर हेच टेलेंटचं स्मशानही आहे हे नाकारून चालणार नाही. येथे अपमान आणि शोषणाला नेहमी सामोरे जावे लागते. मात्र, यासोबत स्वप्ने, आशा आणि विश्वास या गोष्टीही नष्ट होवून जातात.’

तुमच्या जवळचे लोकं तुमचे अपयश साजरे करताना दिसतात

‘बॉलिवूड हे एक असे क्षेत्र आहे की, येथे काही कारणास्तव स्वप्ने तुटली तर तुमच्या जवळचे लोकं तुमच्यावर हसतात आणि तुमचे अपयश साजरे करताना दिसतात. व्यक्ती अन्नाशिवाय जगू शकतो. परंतु आदर, आत्ममूल्य आणि आशा याशिवाय जगणे अशक्य आहे. बॉलिवूडमध्ये येणारा प्रत्येक व्यक्तीला अपमानाचा सामना करावा लागतो. यामुळे येणारा प्रत्येकजण लढण्याआधी हार मानतो. परंतु, नशीबवान आहेत ते मात्र, या झगमटापासून दूर जातात. या क्षेत्रात मिळणार यशही फार काळ टिकत नाही. तर ड्रग्ज, दारू आणि सर्व चुकीच्या गोष्टींच्या आहारी गेल्याने जीवन बर्बाद करतात. मात्र, काही क्षणापुरती पैशांची गरज भागते.’, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

शेवटी तुम्ही इतके एकटे पडता. कोणी जवळ घेते नाही

‘या क्षेत्रात अनेक संकटाचा सामना करावा लागतो. तुमच्या आतील भावना, दु: ख काहीवेळा लपवावे लागते आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणावे लागते. क्षणाक्षणाला तुम्हाला सुपरस्टारसारखे दिसावे लागते.  सोशल मीडियावर फॉलोअर्स मोफत उपलब्ध नसतात तर एक स्टार म्हणून तुम्हाला त्याचे पैसे मोजावे लागतात. या दुनियेत सर्व काही मिळवण्यासाठी पैशाचा वापर केला जातो. परंतु, तुम्ही एका उंचीवर पोहोचल्यानंतर काही काळात ग्रोथ होण्यास सुरूवात होते. यानंतर मात्र, शेवटी तुम्ही इतके एकटे पडता. कोणी जवळ घेते नाही, कोणी तुमची पर्वा करत नाही. तुमच्या आजूबाजूचे लोकं फक्त तुमच्यावर हसत असतात. असेही विवेक अग्निहोत्री यांनी आपल्‍या पोस्टमध्‍ये म्‍हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button