Riteish Deshmukh And Salman Khan : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटातही सलमान खान | पुढारी

Riteish Deshmukh And Salman Khan : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटातही सलमान खान

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सलमान खान आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh And Salman Khan) यांच्यामध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. रितेशचा पहिला मराठी चित्रपट ‘लय भारी’मध्ये सलमान ‘भाऊ’च्या भूमिकेत झळकला होता. आता रितेशने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘वेड’ मध्येही सलमान भाऊ आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि.१० जुलै) या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती स्वतः रितेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. त्याने म्हटले आहे की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. एका जीवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी ‘लई भारी’ साथ दिली होती. आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक ‘वेड’ केलंय. थँक्यू भाऊ, लव्ह यू!


रितेश सलमानचा जिव्हाळा (Riteish Deshmukh And Salman Khan)

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या जोड्या आहेत. यामध्ये अनेकांचे एकमेकांशी चांगले नाते व मैत्री आहे. अशीच सलमान खान आणि रितेश देशमुख यांची मैत्री बॉलिवूडमध्ये चांगलीच परिचीत आहे. तसेतर सलमान हा सर्वच मित्रांसाठी हक्काने धावून जातो असे म्हटले जाते. तसा तो दर वेळी रितेशसाठी धावून येतो. रितेश देशमुख याच्या २०१४ साली आलेल्या ‘लय भारी’ या चित्रपटात ‘भाऊ’चा कॅमिओ रोल केला होता. मराठीमध्ये रितेश आणि सलमानच्या या सीनला चित्रपटगृहात खूपच टाळ्या पडल्या होत्या. आज ही त्यांचा हा सीन युट्यूब वर वारंवार पाहिला जातो. मराठी मधील सलमानचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाच्या यशानंतर सलमानने रितेशला तो जे चित्रपट निर्माण करेल त्याचा मी भाग असेन असे म्हटले होते. सलमान हा नेहमीच शद्ब पाळत असतो. ‘वेड’ या चित्रपटाद्वारे रितेश हा दिग्दर्शनात पदार्पन करत आहे. या त्याच्या महत्त्वकांशी प्रोजेक्टमध्ये सलमान कसा मागे राहिल. तर दिलेल्या शद्बाप्रमाणे सलमान हा ‘वेड’ या चित्रपटात पुन्हा एकदा कॅमिओ रोल करत आहे. त्यामुळे सलमान रितेशची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पहायला मिळणार आहे.

Riteish Deshmukh And Salman Khan

रितेशसोबत दिसणार जेनेलिया (Riteish Deshmukh And Salman Khan)

रितेशची पत्नी व अभिनेत्री जेनेलिया डिसोझा देखिल ‘वेड’ मध्ये रितेश सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जेनेलियाचा हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटानंतर रितेश आणि जेनेलिया पुन्हा एका आपल्याला मराठीमध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या क्युट कपलला पाहण्यासाठी सारेच आतुर आहेत. या आधी या दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ मधून दोघांनी एकत्र चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ही जोडी ‘मस्ती’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. तसेच लय भारी या चित्रपटात जेनेलियाने एका गाण्यामध्ये दिसली होती. जेनेलिया सह या चित्रपटात जिया शंकर, अशोक सराफ, शुभंकर तावडे हे देखील दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

Back to top button