Dinesh Karthik : पत्नीने धोका दिल्यानंतर दिनेश कार्तिक करणार होता आत्महत्या

Dinesh Karthik : पत्नीने धोका दिल्यानंतर दिनेश कार्तिक करणार होता आत्महत्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2022 मध्ये दिनेश कार्तिकची (dinesh karthik) बॅट तळपत आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला असून या संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. या आयपीएल हंगामात कार्तिकने सात सामन्यांत 210 धावा केल्या असून तो एकदाच बाद झाला आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 200 पेक्षा जास्त आहे. विशेष बाब म्हणजे कार्तिकने संघासाठी फिनिशर म्हणून भूमिका बजावली आहे. यातूनच त्याने धावा जमवल्या आहेत.

कार्तिकने (dinesh karthik) या आयपीएलपूर्वी सांगितले होते की, 2022 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत त्याला भारतासाठी फिनिशर म्हणून खेळायचे आहे. मात्र, त्यावेळी भारतीय संघात त्याचे स्थान अवघड वाटत होते. आयपीएलच्या पहिल्या सात सामन्यांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केल्यानंतर कार्तिक भारतीय संघात पुनरागमन करू शकतो असा अंदाज बांधण्यात आला आहे. खुद्द विराट कोहलीही असेच मानतो. मात्र, भारतीय क्रिकेट संघात परतण्याचा प्रवास कार्तिकसाठी सोपा नव्हता.

धोकादायक फलंदाजीच्या बाबतीत 36 वर्षीय कार्तिकने युवा खेळाडूंनाही चकित केले आहे. एक काळ असा होता की पत्नीच्या अफेअरमुळे कार्तिक (dinesh karthik) पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला होता. याचबरोबर त्याच्या फलंदाजीचा आलेखही खाली जात होता. या खेळाडूने आपली क्रिकेट कारकीर्द पुन्हा रुळावर कशी आणली हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया?

दिनेश कार्तिक (dinesh karthik) हा महान फलंदाज आहे. त्याने आपल्या फलंदाजी आणि विकेटकीपिंगने लोकांना खूप प्रभावित केले. एक काळ असा होता की धोनीचा पर्याय म्हणून दिनेश कार्तिककडे पाहिले जात होते. पण, यष्टिरक्षक होण्याचा फटका त्याला सहन करावा लागला. धोनीमुळे त्याला संघात जास्त खेळण्याची संधी मिळू शकली नाही. दुसरीकडे त्याची पत्नी निकिताचे मुरली विजयसोबत अफेअर सुरू होते. हा प्रकार दिनेशला समजताच तो पूर्णपणे तुटून पडला होता. हा काळ त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.

यानंतर 2012 मध्ये दिनेश कार्तिक (dinesh karthik) आणि निकिताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिबेशची पत्नी निकिता मुरली विजयसोबत राहू लागली. त्यावेळी मुरली विजय त्याच्या करिअरच्या शिखरावर होता, मुरलीने आयपीएलमध्ये चेन्नईसाठी चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली. ज्याच्या जोरावर त्याची टीम इंडियात निवड झाली. या घटनेनंतर कार्तिकच्या कामगिरीचा आलेख घसरायला लागला. खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून तामिळनाडू संघाचे कर्णधारपद हिसकावून मुरली विजयकडे देण्यात आले. या कठीण काळातून बाहेर पडणे कार्तिकसाठी सोपे नव्हते. तो डिप्रेशनमध्ये गेला आणि आत्महत्या करण्याचा विचार करू लागला.

असे जीवन पुन्हा रुळावर आले…

दु:खाचे ढग दूर झाल्यावर प्रत्येकाच्या आयुष्यात सुख नक्कीच येते. दिनेश कार्तिकच्या आयुष्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. दीपिका पल्लीकल नावाच्या युवतीने त्याच्या आयुष्यात आनंद आणला. कार्तिकला नवसंजीवनी देण्याचे काम दीपिकाने केले. दोघेही जिममध्ये भेटले होते. जिथे दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 2015 मध्ये दीपिका आणि दिनेश लग्नबंधनात अडकले.

त्यानंतर कार्तिक याने त्याच्या आयुष्याच्या भूतकाळाकडे कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने पुन्हा नेटमध्ये सराव सुरू केला आणि देशांतर्गत सामन्यांमध्येही धावा काढण्यास सुरुवात केली. दीपिका-दिनेश हे जोडपे लग्नानंतर एकमेकांची चांगली काळजी घेऊ लागले. दीपिकाने दिनेशला प्रत्येक वळणावर साथ दिली. तिच्या या धाडसामुळे दिनेशची क्रिकेट कारकीर्द पुन्हा एकदा उंच भरारी घेऊ लागली. कार्तिकची टीम इंडियासाठी निवड झाली आणि त्यानंतर त्याला कोलकाता संघाचा कर्णधारही बनवण्यात आले.

ट्रेनरच्या आग्रहाने आयुष्य बदलले

कार्तिकने सर्व ट्रेनिंग आणि व्यायाम करणे सोडल्याचे दिनेश कार्तिकच्या ट्रेनरला समजले. तेव्हा तो ट्रेनर दिनेशच्या घरी गेला. त्याचे घरातील परिस्थिती अस्ताव्यस्त होती. कार्तिक मोठी दाढी वाढवून बसला होता. त्याच्या प्रशिक्षकाने त्याला पुन्हा जिम सुरू करण्यास सांगितले, जिथे तो स्कॉश खेळाडू दीपिका पल्लीकललाही प्रशिक्षण देत होता. कार्तिक दीपिकाला जिममध्ये भेटला आणि त्यांचे आयुष्य बदलले. पल्लीकलने ट्रेनरसोबत कार्तिकशी बोलण्यास सुरुवात केली आणि त्याला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली.

घर घेण्यासाठी पुन्हा घेतली मेहनत

दिनेश कार्तिकचे पोस गार्डनमध्ये घर घेण्याचे स्वप्न होते, परंतु ते खूप महाग होते. आई झाल्यानंतर दीपिकाने सांगितले की, दोघे पुन्हा मेहनत करू आणि खेळून पैसे कमावून घर खरेदी करू. दीपिकानेही आई झाल्यानंतर स्कॉश खेळायला सुरुवात केली आणि कार्तिकने पुन्हा नेट प्रॅक्टीस सुरू केली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार सोडला. त्याने कॉमेंट्रीमध्येही हात आजमावला आणि इथेही तो सुपरहिट ठरला. यानंतर त्यांनी पोस गार्डनमध्ये घरही घेतले. अखेर आयपीएल 2022 मेगा लिलावात बंगळूर संघाने त्याला विकत घेतले. दिनेशनेही आपल्यावरील विश्वास सार्थ करून दाखवला आणि बॅटमधून धावा वसूल केल्या.

कोणत्याही खेळाडूला सातत्यपूर्ण फॉर्ममध्ये राहणे कठीण असते. जेव्हा एखादा खेळाडू खराब फॉर्ममधून जातो तेव्हा चाहते त्याच्यावर टीका करू लागतात. कार्तिक जेव्हा त्याच्या कारकिर्दीतील खराब फॉर्मशी झुंजत होता तेव्हा त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्याकडून आयपीएलमधील कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. यादरम्यान दीपिका गरोदर राहिली आणि तिने 2021 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला.

त्यानंतर कार्तिक कॉमेंट्री करताना दिसला. त्याचवेळी, पुन्हा आयपीएलमध्ये सामील झाल्यानंतर, दिनेश कार्तिक आरसीबीसाठी धावा करत आहे. तो फिनिशर म्हणून समोर आला आहे. त्याच्या कामगिरीवर चाहते खूप खूश आहेत. त्याचवेळी डीकेने यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डमध्ये खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news