पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचे प्रकरण ( Jiah Khan Suicide Case ) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जियाच्या मृत्यूला जवळपास ९ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या प्रकरणाचे गूढ उकलेलं नाही. नुकतेच जिया खानची आई राबिया खानने जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने तिच्याशी वाईट वर्तणूक केल्यानेच तिने आत्महत्या केल्याचे खुलासा केला होता. जियाच्या मृत्यूनंतर सूरज आणि जिया एकमेकांना डेट करत असल्याची माहितीही समोर आली हाेती. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर आता फॉरेंसिक रिपोर्टनुसार एक नवीन माहिती समोर आली आहे.
जियाच्या आत्महत्येप्रकरणी कोर्टाने पुन्हा एकदा राबिया खानची २२ ऑगस्टला उलटतपासणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच 'सीएफएसएल'च्या (CFSL) क्लिनिकल सायकोलॉजिस्टने विशेष न्यायालयात सूरज पांचोलीबाबत एका नवीन गोष्टीचा खुलासा केला आहे. यात सूरज पांचोली तपासादरम्यान महत्वाची माहिती आणि बरंच काही मुद्दे लपवत असून काही गोष्टींवर मौन बाळगल्याचे म्हटलं आहे.
जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोली जामिनावर बाहेर आहे. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या वरिष्ठ मानसशास्त्रज्ञाने सूरजच्या मुलाखतीची फॉरेन्सिक तपासणी केली होती, ज्याचा अहवाल त्याने सीबीआय न्यायालयात सादर केला आहे. या रिपोर्टनुसार, सूरज तपासादरम्यान खरी माहिती लपवत असून जिया खानच्या मृत्यूशी आपला काहीही संबध नसल्याचे भासवत आहे. तसेच त्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. परंतु, जियाच्या आत्महत्येमागील सत्य काय आहे हे सूरजला माहीत आहे. असेही त्यात म्हटलं आहे.
सूरजला तुमचं नातं तुटण्याचे खरे कारण काय आहे? असे विचारण्यात आलं होतं. यावर उत्तर देण्यास सूरजने टाळाटाळ केली आणि मौन पाळले. तर सूरजने त्याची मान शरमेने खाली घालती होती. यावरून सूरज, जियासोबत केलेले शेवटचे संभाषण लपविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले होते. ज्यातून जियाच्या मृत्यूच्या रहस्याचा उलघडा झाला असता. तर दुसरा प्रश्न जियाची शेवटची मानसिक स्थिती काय होती असे सूरजला विचारण्यात आलं होतं. यावरही सूरजकडून काही खास माहिती मिळाली नाही. ही मुलाखत २०१५ मध्ये विशेष सरकारी वकील मनोज चलदन यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती.
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ रोजी तिच्या जुहू अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर ६ पानी सुसाईड नोट सापडली होती. या सुसाईट नोटमध्ये सूरज पांचोलीच्या नावाचा उल्लेख होता. या नोटमध्ये सूरजसोबतचे ब्रेकअप, नातं आणि प्रेमाबाबत अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. यानंतर जियाची आई राबिया खानने सूरजविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. सीबीआय सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. ( Jiah Khan Suicide Case )
हेही वाचलंत का?