Poonam Pandey
Poonam Pandey

Poonam Pandey : बोल्ड कपड्यात पूनम पाणीपुरी खाताच चाहते म्हणाले, “नौंटकी’, ‘Ohooo…”, (व्‍हिडिओ)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क: माॅडेल पूनम पांडे (Poonam Pandey ) नेहमी फॅशन सेंन्ससाठी चर्चेत असते. सध्या पूनमच्या पाणीपुरी खातानाच्या व्हिडिओने सोशल माडियात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नाचा भडिमार करत तिला ट्रोल केले आहे.

नुकताच अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey)चा मुबंईच्या रस्त्यावर पाणीपुरी खातानाचा एक व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यावेळी पूनमने व्हाइट कलरचा बॅकलेस ब्रा स्टाइल टॉपसोबत मिनी स्कर्ट परिधान केलाय. पूनमच्या या टॉपचा गळ्या खूपच डिपनेक असून मिनी स्कर्टदेखील घट्ट (फिट) आहे. पूनमवर कॅमेऱ्याची नजर पडताच ही बाब चाहत्याच्या निर्दशनास आली. यानंतर हा तिचा लूक चाहत्यांना अजिबात अवडलेला नाही. तर याच दरम्यान काही चाहत्यांनी तिचे कौतुकदेखील केले आहे.

या व्हिडिओमध्ये पूनम पांडे रस्त्यावरील स्टॉलवर पाणीपुरी खाताना स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पूनमच्या प्लेटमध्ये फक्त दोनच पाणीपुऱ्या दिसल्या आहेत. यावर चाहत्यांनी तिला दोनच पाणीपुरी का खाताय? असे विचारल्यावर तिने 'जगण्यासाठी एवढेचं पूरे आहे. नाहीतर अजून डंबेल्स मारावे लागतील.' असे प्रतिउत्तर दिले आहे. याशिवाय तिने कॅमेऱ्यासमोर पाणीपुरी धरून कोणी खाणार आहे का? असेही विचारणा केली आहे. पूनमचा हा बोल्ड लूक आणि स्टाइल पाहून चाहत्यांना मात्र आश्चर्यचा धक्का बसला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पूनम पांडेला टॅग करत 'eating pani poori ??"असे म्हटलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या प्रश्नाचा भडिमार करत ट्रोल केले आहे. यात 'कोणत्या लग्नातील चष्मा परिधान केलाय?'. 'एवढं कोण काळजी घेत का?', 'असा लोकांना का सपोर्ट केलं जातायं?', 'cheat day चा अर्थ माहिती नाही का?' , 'कपड्याची ॲलर्जी आहे का? ', 'येवढे पैसे मिळवून काय उपयोग कपडे खरेदी करू शकत नाही', यासारखे प्रश्न विचारण्यात आलं आहेत.

काही नेटकऱ्यांनी तिचे कौतुक करताना 'Perfect??', 'नौंटकी', 'Ohooo', 'Cartoon', 'Nice❤️','Nice look' असेही म्हटले आहे. आतापर्यत या व्हिडिओला ४५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. पूनम नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून सक्रिय असते. तर पूनम शेवटची कंगना राणावतच्या 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news