मुंबई : पुढारी ऑनलाईन; पॉर्न व्हिडिओ प्रकरणी पती राज कुंद्राविराेधात झालेल्या कारवाईमुळे बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी वादाच्या भोवर्यात सापडली आहे. पॉर्न व्हिडिओ प्रकरणी मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत शिल्ला शेट्टीवर पुन्हा एकदा अप्रत्यक्ष आरोप केले आहेत.
दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये शर्लिनने म्हटले आहे की, शिल्पा दीदी माझी तुम्हाला विनंती आहे की, पीडित युवतींबद्दल तुम्ही थोडीतरी सहानभूती बाळगावी. स्वत:च्या चुका कबूल केल्या तर कोणाचीही प्रतिमा लहान होत नाही.
या व्हिडिओनंतर शर्लिनने एक पोस्ट केली आहे. या पोस्टबरोबर तिने राज कुंद्रासमवेतचा फोटोही शेअर केला आहे.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, २२ मार्च २०१९ रोजी मी, माझा मॅनेजर डी. के. श्रॉफ जुहूमधील डब्ल्यू मॅरियटमध्ये प्रथम राज कुंद्राला भेटलो.
यावेळी राज याने आपली कंपनीची माहिती दिली. तसेच द शर्लिन चोप्रा ॲप आयोजनचीही माहिती दिली होती.
मी २६ मार्च २०१९ रोजी कुंद्राची कंपनी आमस्प्राईमबरोबर करार केला होता, असेही शर्लिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राज कुंद्राशी संबंधित पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राची मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने चौकशी केली हाेती.
सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर शर्लिनने चौकशीचे ठिकाण सोडले. या चौकशीदरम्यान तिने अनेक तपशील उघड केले हाेते.
शर्लिनने चौकशीबाबतची माहिती देताना सांगितले हाेते की, मला २०१९ पासून आर्म्सप्राइम आणि माझ्यातील कराराबद्दल विचारण्यात आले. त्याआधी मी राज कुंद्राला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटले होते आणि त्या बैठकीत त्याच्याशी झालेल्या माझ्या संवादाबद्दल, तसेच आमच्या कराराबद्दलची माहिती पोलिसांना दिली. तसेच आमच्या करारानंतर किती व्हिडिओ बनवले गेले याबद्दलही सांगितले.
ती म्हणाली हाेती की, मला आमच्या व्हिडिओंच्या शूटिंग दरम्यान कोण उपस्थित होते आणि कंटेंट निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांबद्दल देखील विचारले गेले.
मला राज कुंद्राच्या कंपनी हॉटशॉट्स, बॉली फेम आणि इतरांबद्दल आणि राज कुंद्रासोबतच्या माझ्या नातेसंबंधाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले.
राजने माझ्या घरी कधी भेट दिली आणि त्याच्या भेटीचे कारण काय होते? याचीही माहिती शर्लिनने पोलिसांना सांगितली हाेती.
शर्लिन म्हणाली हाेती की, राज कुंद्रा तरुणींची दिशाभूल करत होता. मला वाटते की त्या सर्व मुली ज्यांची दिशाभूल केली गेली आहे, त्यांना भारतातील पोर्नोग्राफीशी संबंधित नियम आणि त्यानंतरच्या शिक्षेबद्दल माहिती नसेल.
कामाच्या शोधात या क्षेत्रात येणा-या तरुणी विचार करतात की जर राज कुंद्रा "ठीक आहे" असं म्हणत असेल तर त्या राज कुंद्राच्या बोलण्याला सत्य मानतात. आणि इथेच दिशाभूल सुरू होते.
मला फक्त पीडित तरुणींना विनंती करायची आहे की त्यांनी पुढे यावे आणि त्या या क्षेत्रात कशा आल्या आणि कशा आकर्षित झाल्या हे उघड करावं.
शर्लिन चोप्राने आर्मप्राईमशी केलेल्या कराराचा तपशील पोलिसांना शेअर केला हाेता.
तिने हे देखील स्पष्ट केले हाेते की, हे प्रकरण कोणत्याही प्रकारे सूडबुद्धीचा खेळ नाही, परंतु पोर्नोग्राफीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न आहे.
हेही वाचलं का ?