पॉर्नोग्राफी : ‘मला पॉर्न पाहण्यास भाग पाडण्यात आलं”, राज कुंद्रानंतर ULLU अॅप अडचणीत | पुढारी

पॉर्नोग्राफी : ‘मला पॉर्न पाहण्यास भाग पाडण्यात आलं”, राज कुंद्रानंतर ULLU अॅप अडचणीत

मुंबई : पुढारी ऑनलाईन : राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर Ullu हे अॅप ही पॉनोग्राफी प्रकरणात चर्चेत आले आहे. या अॅपचे CEO विभू अग्रवाल आणि कंट्री हेड अंजली रैना यांच्या विरोधात कंपनीच्या माजी कायदेशीर सल्लागार महिलेने अंबोल पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दिली आहे.

अग्रवाल आणि रैना यांनी याविरोधात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे. अग्रवाल आणि रैना यांच्या अर्जावर २१ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

पीडितेचे वकील सत्यम सिंग राजपूत यांनी याचिकेत म्हटलं आहे की ULLU या अॅपच्या विरोधात यापूर्वीच अश्लिल कंटेट प्रसारित केल्याचे आरोप झालेले आहेत.

आताच्या केसमध्ये पीडित महिलेने जून महिन्यात तिचा विनयभंग केला असल्याचं म्हटलं आहे.

तसेच तिला जबरदस्तीने पॉर्न व्हिडिओ पाहायला लावले असं ही तिनं म्हटलेलं आहे.

अग्रवालकडून विविध गोष्टीसाठी दबाव

न्यायालयात पीडितेच्या वतीने असं सांगण्यात आलं आहे की,”अग्रवाल याने माझ्यावर पॉर्न आणि इरॉटिक व्हिडिओत काम करण्यासाठी दबाव टाकला, तसेच पॉर्नोग्राफी पॉडकॉस्टमध्ये मादक आवाज देण्यासाठीही दबाव टाकला. पण जेव्हा पीडितेने याला नकार दिला.

त्यानंतर अग्रवाल आणि रैना यांनी दिशाभूल करून पीडितेला ऑफिसमध्ये बोलवलं आणि तिला नग्न होण्यास भाग पाडले.

तसेच ULLU मर्कंडाईजवर विक्री करण्यात येणारे अंडरगार्मेंटचे सँपल परिधान करायला लावून तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि हे फोटो आणि व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.”

पीडितीने जून महिन्यातील संबंधित दिवसांचे कार्यालयातील फुटेल जप्त करण्याची मागणी केली आहे.

लॉ बीट या कायदेविषय वेबसाईटवर या केसबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Back to top button