tejaswi prakash : तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट 'या'दिवशी भेटीला | पुढारी

tejaswi prakash : तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट 'या'दिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस-१५ ची विजेती आणि नागिन-६ ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा (tejaswi prakash) पहिला मराठी चित्रपट ‘मन कस्तुरी रे’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तेजस्वी प्रकाशने आतापर्यंत संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का, नागिन अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तेजस्वीच्या चाहत्यांसाठी तिचा हा मराठी चित्रपट एक ट्रीट असेल. तेजस्वीसोबत या चित्रपटात अभिनय बेर्डे आहे. ती सध्या काय करते, अशी ही आशिकी आणि रंपाटनंतर अभिनयाच्या नव्या रोमँटिक चित्रपटाची त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे. (tejaswi prakash)

चंचल मनाची प्रेमकथा, असं मन कस्तुरी रे चित्रपटाबद्दल म्हणता येईल. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत मानेनी (खारी बिस्कीटचा लेखक) केले आहे. तर अनेक वेगवेगळे मराठी चित्रपट आणणाऱ्या नितीन केणी यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मुव्ही स्टुडिओजने याची प्रस्तुती केली आहे. मुंबई मुव्ही स्टुडिओज यांनी आतापर्यंत मराठीत लोचा झाला रे , शेरशिवराज, मल्याळममध्ध्ये पाथम वळवू असे वेगवेगळे चित्रपट आणले आहेत.

निर्माते नितीन केणी गदर, रुस्तम, सैराट, शेरशिवराज-स्वारी अफजलखान या यशस्वी चित्रपटानंतर आता ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. त्याचबरोबर वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी मन कस्तुरी रे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निशीता केणी आणि करण कोंडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

Back to top button