HBD Aditya Narayan : शंभरहून अधिक गाणी गायलेल्या आदित्य विषयी माहितीये का? | पुढारी

HBD Aditya Narayan : शंभरहून अधिक गाणी गायलेल्या आदित्य विषयी माहितीये का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही शो अँकर आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा अभिनेता आदित्य नारायणचा (HBD Aditya Narayan) आज वाढदिवस आहे. आदित्य इंडस्ट्रीतील प्रसिध्द चेहरा आहे. मोठा पडदा ते छोट्या पडद्यापर्यंत आदित्यने प्रत्येक जागी आपल्या कौशल्याची जादू दाखवलीय. बालकलाकार म्हणून चित्रपटात दिसणारा आदित्य नारायण आज (६ ऑगस्ट) ३५ वर्षांचा झाला आहे. आदित्यचा जन्म १९८७ रोजी मुंबईत झाला. आदित्य आज एक उत्तम होस्ट आहे. (HBD Aditya Narayan) त्याच्या वाढदिवसाविषयी जाणून घेऊया या खास गोष्टी-

आदित्य नारायणने वयाच्या चौथ्या वर्षी पहिल्यादा गाणे गायले होते. पण, प्लेबॅक सिंगर म्हणून एका नेपाळी चित्रपटात मोहिनीच्या गाण्यासाठी आपला स्वरसाज चढवला होता. १९९५ मध्ये त्याने पहिल्यांदा आपले वडील उदित नारायणसोबत ‘अकेले हम अकेले तुम’ चित्रपटात गाणे गायले होते. याशिवाय, आदित्य नारायणने आशा भोसले यांच्यासोबत गायलेले गाणे रंगीलामध्ये देखील कॅमियो केला होता.

आदित्यने १०० हून अधिक गाण्यांना आवाज दिला. इतकंच नाही तर त्याच्या नावावर एक अल्बमही रिलीज झाला होता. त्याच्या आवाजातील १९९६ मध्ये आलेल्या मासूम चित्रपटातील ‘छोटा बच्चा जान के’ हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. या गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालगायकाचा क्रिटिक्स पुरस्कार मिळाला. याशिवाय आदित्यने १६ भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

आदित्यने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. असे म्हणतात की, १९९५ मध्ये सुभाष भाईंनी आदित्यला पहिल्यांदा लिटिल वंडर्स ग्रुपमध्ये परफॉर्म करताना पाहिले होते. यानंतर दिग्दर्शकाने त्याला ‘परदेस’ चित्रपटासाठी साईन केले, ज्यामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि महिमा चौधरी मुख्य कलाकार म्हणून दिसले होते. यानंतर तो ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातही दिसला. मात्र, २००९ मध्ये आलेल्या ‘शापित’ चित्रपटातून त्याने मुख्य कलाकार म्हणून पदार्पण केले. विक्रम भट्ट दिग्दर्शित या चित्रपटासाठी आदित्यने केवळ चार गाणी गायली नाहीत तर ती स्वतः लिहिली आहेत.

आदित्यला गायन आणि अभिनयात विशेष काही करता आले नसले तरी छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून त्याने खूप नाव कमावले. आदित्य नारायण अनेक रिअॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणून दिसला आहे. याशिवाय तो स्टंट रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीच्या ९व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणूनही दिसला होता. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, त्याने ११ वर्षांच्या डेटिंगनंतर २०२० मध्ये गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले होते.

Back to top button