mary millben : अमेरिकन गायिका मेरी मिलबेन स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी भारतात येणार | पुढारी

mary millben : अमेरिकन गायिका मेरी मिलबेन स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी भारतात येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात आफ्रिकन, अमेरिकन गायिका मेरी मिलबेन (mary millben) सहभागी होणार आहे. ‘ओम जय जगदीश हरे’ आणि ‘जन गण मन’ गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मिलबेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “डॉ. मार्टिन ल्यूथर किंग जुनियर यांच्या पावलावर पाऊल ठेवून, मी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या उत्सवासाठी सांस्कृतिक राजदूत म्हणून युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळाला आहे. (mary millben )

मिलबेन हे पहिली अमेरिकन कलाकार आहे, जिला ICCR ने स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी भारतात आमंत्रित केले आहे. या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ती अमेरिकेची प्रतिनिधीत्व करणारी अधिकृत पाहुणी असेल. या विशेष प्रसंगी मिलबेन म्हणाली, “मी ही भरभराट होत असलेली मातृभूमी, भारत आणि जगभरातील भारतीय समुदायांसोबतचे आमचे नाते आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी अमेरिका आणि भारत यांच्यातील महत्त्वपूर्ण लोकशाही युती साजरी करण्यास उत्सुक आहे.”

मिलबेन पुढे म्हणाले, “मी माझ्या पहिल्या भारत भेटीची तयारी करत असताना, माझ्या मनात डॉ. मार्टिन किंग ल्यूथर यांचे शब्द ऐकू येत आहेत, ज्यात ते म्हणाले होते, ‘इतर देशांमध्ये मी पर्यटक म्हणून जातो. पण भारतात मी एक यात्रेकरू म्हणून येतो.”

मिलबेन भारतात पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली जेव्हा तिने ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हर्च्युअली भारताचे राष्ट्रगीत गायले. यानंतर २०२० मध्ये दिवाळीत तिने स्वतः ‘ओम जय जगदीश हरे’ गातानाचा एक व्हिडिओ रिलीज केला. दिल्ली व्यतिरिक्त, देशाच्या स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात येणारी मिलबेन भारत भेटीदरम्यान लखनौला जाण्याचा विचार करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mary Millben (@marymillben)

Back to top button