Yog Yogeshwar Jay Shankar : योगयोगेश्वर जय शंकर मध्ये पावनीच्या भूमिकेत सृष्टी पगारे | पुढारी

Yog Yogeshwar Jay Shankar : योगयोगेश्वर जय शंकर मध्ये पावनीच्या भूमिकेत सृष्टी पगारे

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रावण महिन्याचे हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिना म्हटलं की, अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते. त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो. याचबरोबर येते संततीरक्षणार्थ केली जाणारी जिवतीची पूजा, या पुजेचे महत्वदेखील काही खास आहे. (Yog Yogeshwar Jay Shankar) लवकरच कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये जीवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये याचे महात्म्यदेखील गोष्टी रूपात सांगितले जाणार आहे. याचसाठी मालिकेत एक विशेष एंट्री होणार आहे. स्वामिनी मालिकेत रमा बनून मराठी मनावर जिने अधिराज्य गाजवले. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले अशी “सृष्टी पगारे” मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. (Yog Yogeshwar Jay Shankar)
मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचे कुटुंब राहायला येणार आहे. त्यांचीच मुलगी पावनी. जिचा विश्वास आहे तिचा भाऊ परत येणार आहे. तसे तिला भास देखील होत आहेत. आता पावनीचे हे भास खरे आहेत का ? तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का ? बाळ शंकर यात तिची मदत कशी करतील ? हे सगळे मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागांमध्ये बघायला मिळणार आहे.
याबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, “मी या भूमिकेसाठी खूपचं उत्सुक आहे. आरुषसोबत काम करायला मिळतं आहे माझं भाग्य आहे. कामाबरोबर बरीच धम्माल मस्ती देखील सुरु असते आमची सेटवर. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि आमची मालिका नक्की बघा”.

Back to top button