Samruddhi Kelkar : नाकात नथ, डोईवर साज समृद्धी खूपच गोंडस दिसतेस…

Samruddhi Kelkar
Samruddhi Kelkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'फुलाला सुगंध मातीचा' फेम आणि अभिनेत्री समृद्धी केळकर ( Samruddhi Kelkar ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिचा मालिकेतील मंगळागौरीचा मराठमोळा लूकने ती चाहत्यांच्या भेटीस आली आहे. समृद्धीच्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री समृद्धी केळकर ( Samruddhi Kelkar ) 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून चाहत्याच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील सीनसाठी तिने घेतलेल्या मेहनतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात ती हातात काठी घेऊन उंचावर बांधलेल्या दोरीवरून चालताना दिसतेय. हा तिचा व्हिडिओ चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे. या सीननंतर मालिकेत मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडत आहे. याच दरम्यानचा समृद्धी केळकरचा एका मराठमोळा लूक व्हायरल झाला आहे.

शेअर झालेल्या फोटोत समृद्धी निळ्या रंगाच्या पैठणीसोबत रेड रंगाच्या ब्लाऊजमध्ये दिसतेय. केसांची स्टाईल, डोक्यावर परिधान केलेला मुकूट, नाकात नथ, साजेशीर दागिने, हातात हिरव्या बांगड्या आणि मेकअपने तिच्या सौंदर्य खुलून दिसतेय. शेअर झालेल्या व्हिडिओ ब्लॅक ॲन्ड व्हाईट आहे. यात समृद्धीसोबत एक झोपाळा आणि फुलांच्या माळांनी सजलेला सेज खूपच सुंदर दिसत आहे. यातील खास म्हणजे, यावेळी समृद्धी जमिनीवर बसलेली असून तिने आपले मंगळसुत्र हातात घेवून हसताना आणि लाजताना हटके दिसते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'मी मज हरपून बसले ग…..?' असे म्हटले आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या एका युजर्सने 'खुप सुंदर दिसतेस ?', 'गोंडस ??', 'Sundar❤️', 'लय ग्वाड ?', 'Gorgeous beauty??my hot crush??', 'Ahhaaa ?❤️?', 'Gorgeous look ??❤️❤️', 'अप्रतिम?', 'Uffff ?' , 'क्यूटनेस ओव्हरलोड ??', '?कडक ?', 'Nice', 'आहा सुंदराऽऽऽऽ ?❤️'. यासारख्या अनेक कॉनेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास २० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news