Megha Shetty : कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण | पुढारी

Megha Shetty : कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. निर्माचे दिपक राणे यांनी आपल्या या सिनेमातून कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीला मराठी चित्रपटात लाँच केले आहे. मेघा शेट्टी (Megha Shetty ) ही कन्नड टीव्ही आणि चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. ट्रायबल रायडींग आणि दिलपसंद या चित्रपटातही मेघाने काम केले आहे. कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात बिझी अभिनेत्री म्हणून मेघाचे नाव घेतले जाते. (Megha Shetty )

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्री यांची निर्मिती असलेला आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे रोमँटिक-एक्शनपट आहे. या चित्रपटात कन्नड स्टार कवीश शेट्टी मुख्य भूमिकेत आहे आणि त्याचं पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या सिनेमातील नायिका मेघा शेट्टी हिचे पोस्टर प्रदर्शित कऱण्यात आले आहे. मेघाच्या वाढदिवसानिमित्त तिचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे. कवीशचे पोस्टर ॲक्शन अंदाजात दिसून आले होते. तर मेघाचा लूक हा शांत, साधा, सालस असा आहे. पाहिल्यावरच प्रेमात पडावे असा लूक मेघाचा आहे.

हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम या भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी या सोबत मराठीतील शिवानी सुर्वे, विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे. सदागरा राघवेंद्र यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर दीपक राणेंसोबत चित्रपटाची निर्मिती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होईल.

Back to top button