Mithilesh Chaturvedi : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन | पुढारी

Mithilesh Chaturvedi : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. बुधवारी (दि.३) सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आपला असा खास चाहता वर्ग निर्माण केला होता.

Mithilesh Chaturvedi :  कोई मिल गया मध्ये शिक्षकाची भुमिका

मिथिलेश चतुर्वेदी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ते लखनौला गेले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. गदर: एक प्रेम कथा, सत्या, अशोका, ताल, बंटी और बबली, क्रिश, रेडी आदी चित्रपटातून त्यांनी चाहत्यांच्या मनावर छाप पाडली. कोई मिल गया या चित्रपटातील भूमिकेने त्यांना एक ओळख दिली. या चित्रपटात त्यांनी ऋतिक रोशनच्या शिक्षकाची भुमिका केली होती.

‘भाई भाई’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण 

मिथिलेश चतुर्वेदीने यांनी १९९७ मध्ये  ‘भाई भाई’ चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी मागे वळून नाही पाहिले. अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. त्यापैकी  ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’,’सत्या’, ‘ताल’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटात महत्त्वपुर्ण भुमिका साकारल्या. २०२० मध्ये  ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये अभिनय केला होता. अलिकडचा त्यांचा चित्रपट म्हणजे बछडा.

हेही वाचलंत का?

Back to top button