Commonwealth Games 2022: निखत जरीनने सेमिफायनलमध्ये धडक मारत केले पदक निश्चित | पुढारी

Commonwealth Games 2022: निखत जरीनने सेमिफायनलमध्ये धडक मारत केले पदक निश्चित

पुढारी ऑनलाईन : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची स्टार आणि वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत जरीनने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. बुधवारी (दि.०३) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने वेल्सच्या हेलन जोन्सचा पराभव करत, तिने सेमीफायनलमध्ये धडक मारली. तिच्या या कामगिरीमुळे 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठीचे बॉक्सिंगमधील पदक निश्चित झाले आहे. महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिने प्रवेश केला आहे.

निखतने महिलांच्या ५० किलो वजनी गटात वेल्सच्या हेलन जोन्सचा 5-0 असा पराभव केला. तिन्ही फेऱ्यांमध्ये निखतचा वरचष्मा होता आणि तिने प्रतिस्पर्धिला आक्रमक होण्याची एकही संधी दिली नाही. 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी (दि.०३) झालेल्या सामन्यांमध्ये निखतसह भारतासाठी बॉक्सिंगमधील आणखी दोन पदके खेडाळूंनी निश्चित केली. यामध्ये बॉक्सर नीतू गंगास आणि हुसामुद्दीन मोहम्मद यांनी देखील उपांत्यफेरी गाठत आपली पदके निश्चित केली आहेत.

Back to top button