Dearness Allowance |केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ | पुढारी

Dearness Allowance |केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’त (महागाई भत्ता- dearness allowance ) ४ टक्क्यांची वाढ केली आहे. जून महिन्यात आलेल्या ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्स- इंडस्ट्रीयल वर्कर्सच्या (एआयसीपीआय-आयडब्ल्यू) आकडेवारीनंतर ‘डीए’त यंदा चांगली वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बुधवारी, केंद्र सरकारने डीएत वाढ करण्याची घोषणा केली. सरकारच्या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

डीएत (Dearness Allowance)करण्यात आलेल्या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्ता ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी एकूण डीए ३४ टक्के होता. वाढीव महागाई भत्ता सप्टेंबर २०२२ च्या वेतनात मिळेल. तर वाढलेला डीए जुलैपासून लागू करण्यात आला आहे. अर्थात कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन महिने जुलै आणि ऑगस्टच्या एरियरचा पैसा देखील येईल. एकूण एरियरसह मोठी रक्कम त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

 हे ही वाचा :

Back to top button