Sonalee Kulkarni : अप्सरेच्या सौंदर्याचीच चर्चा
पुढारी ऑनलाईन डेस्क : अप्सरा सोनाली कुलकर्मीच्या रुपाची चर्चा तर नेहमीच होत असते. (Sonalee Kulkarni ) अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या सौंदर्याची चर्चा आतादेखील होत आहे. तिच्या अप्रतिम सौंदर्यामागे तिचे डेली रुटीन खूप महत्त्वाचं आहे. आता सोनाली डान्स महाराष्ट्र डान्स या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. तिच्यासोबत गश्मीर महाजनीदेखील परीक्षकाच्या खुर्चीवर आहे. (Sonalee Kulkarni )
सोनालीने तिचे साडीतील काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिला भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. शिवाय, तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक केलं आहे. स्लिव्हलेस ब्लाऊज आणि फिकट निळ्या रंगाची साडी त्यावर मेकअप, गुलाबी रंगाची लिपस्टिकमध्ये ती खूपचं सुंदर दिसतेय.
सोनाली मुळची पुण्याची आहे. मराठीचं नव्हे तर हिंदी चित्रपटातही तिने आपला डंका वाजवला आहे. गाढवाचं लग्न, बकुला नामदेव घोटाळे, आबा झिंदाबाद, हंपी, सा सासूचा, इरादा पक्का, होय काय नाय काय, समुद्र, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला-२, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, शटर, पोश्टर गर्ल ही सोनालीच्या मराठी चित्रपटांची भलीमोठी यादी आहे. मराठीच नव्हे तर 'ग्रॅण्ड मस्ती' आणि 'सिंघम रिटर्न्स' या हिंदी चित्रपटांमध्येही सोनालीने काम केलं आहे.

