Amruta Khanvilkar : पौर्णिमेचा चंद्र आणि अमावस्येचा आऊटफिट, चंद्राचा ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये जलवा

पुढारी ऑनलाईन डेस्क: ‘चंद्रमुखी’ चित्रपटात नजरेच्या बाणांनी घायाळ करणारी चंद्रमुखी म्हणजे, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर होय. हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित असून यात राजकारणी दौलतराव देशमाने यांची भूमिका दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेने दर्जेदार साकारली आहे. चित्रपटातील अभिनेत्री अमृता खानविलकरच्या ( Amruta Khanvilkar ) ‘चंद्रा’ गाण्याची क्रेझ आजही आहे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटानंतर चंद्राने नवनविन हटके, हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या तिच्या आणखी एका ब्लॅक रंगाच्या ड्रेसने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.
नुकतेच चंद्रा म्हणजे, अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) छोट्या पडद्यावरील एका अॅवार्ड शोमध्ये पोहोचली आहे. या अॅवार्ड शोमधील तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. नेहमी नऊवारी साडीत हटके दिसणारी अमृता सध्या ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली. यावेळी मोकळ्या कुरळ्या केसांसोबत मेकअपने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने #themeyesthough असे लिहिले आहे. फोटोला पोझ देताना अमृताने कधी तिच्या कमरेवर तर कधी तिच्या स्वत: च्याच पायांवर हलकसा ठेवल्याचे दिसतेय. याशिवाय ती फोटोत पुढे झुकल्यासारखी दिसतेय. यावेळच्या तिच्या नजरेने चाहत्यांना भूरळ पाडली आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात अभिनेता प्रसाद ओकने तिन फायर ईमोजी शेअर केले आहेत. प्रसादसोबत सोनाली खेर, सुबोध भावे, श्रेया बुगडे, आदीनाथ कोठारे, निना कुलकर्णी, आर्या आंबेकर, मंजिरी ओक, हिना खान, रूतुजा बागवे, प्रियांका बर्वे आणि नेहा पेंडसे यासारख्या अनेकांनी भरभरून कॉमेन्टस करत अमृताचे कौतुक केलं आहे.
याशिवाय काही नेटकऱ्यांनी ‘पौर्णिमेचा चंद्र अमावस्येला आऊटफिट घालतो, तरीही ती नेहमीप्रमाणेच हॉट’, ‘Superb’, ‘Cute’, ‘Dream girl ‘, ‘खूपच सुंदर’, ‘Hot🔥’, ‘U r looking amazing’, ‘Khoop chhaan’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर ईमोजीचा पाऊस पडला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास साडेसहा हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.
याआधीही अमृताने पांढऱ्या रंगाच्या नेट साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोत केसांच्या बनसोबत झुमके आणि मेकअपने चारचॉद लावले होते. चंद्रमुखी चित्रपटानंतर अमृताच्या फॅन फालोव्हर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अमृता ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या चित्रपटातून प्रकाश झोतात आली. मराठी चित्रपटांसोबत तिने हिंदी सिनेमेही गाजविले. अमृताने वेबसिरीजमध्येही काम केल आहे.
हेही वाचलंत का?
- deepika Pathaan movie : ‘पठाण’ मधील दीपिकाचा पहिला लूक रिलीज
- रणवीरच्या न्यूड फोटोंची दीपिकाला आधीच कल्पना होती? Deepika Padukone on Ranveer Singh Nude photo
- Deepika Padukone : चित्रिकरणादरम्यान ह्रदयाचे ठोके वाढल्याने दीपिका पुदुकोन रुग्णालयात
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram