संगमनेर शहरात एटीएम फोडून रोकड लांबविली | पुढारी

संगमनेर शहरात एटीएम फोडून रोकड लांबविली

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील दिल्ली नाका परिसरात एक्सीस बँकेचे एटीएमचे मशीन अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साह्याने फोडून सुमारे 30 लाख 58 हजार 500 रुपये लांबविले असल्याची घटना गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात एक्सीस बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी प्रथमतः एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे कट केले आहे.

त्यानंतर चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले. त्यातील सुमारे 30 लाख 58 हजार 500 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली आहे. सकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या ही घटना लक्षात आली. त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांना माहिती मिळाली. दिल्ली नाका परिसरात एटीएम फोडली असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शना पोलिस पथक घटनास्थळी धाव घेतली आहे. एटीएमच्या जवळपास असलेल्या इतर सीसी टीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता एका स्वीप्ट कारमधून चोरटे आल्याचे दिसून येत आहे.

Back to top button