Celebs Nude Photoshoot : ‘हे’ स्टार्स कॅमेऱ्यासमोर झाले होते न्यूड

star nude photoshoot
star nude photoshoot
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणवीर सिंह नेहमीच आपल्या अतरंगी फॅशनसाठी प्रसिध्द आहे. कुठलाही कार्यक्रम असो किंवा विमानतळावरील लूक आपल्या कपड्यांमुळे तो नहमीच चर्चेत राहतो. तो अनेकदा ट्रोलदेखील होतो. पण, रणवीरला फरक पडत नाही. तो बेफिकिर राहतो. आपल्या फॅशन सेन्सने तो कुठलाही समझोता करत नाही. रणवीरने एका मासिकासाठी फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तो विनाकपडे दिसतो आहे. रणवीरचा हा फोटोशूट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पण, न्यूड फोटोशूट (Celebs Nude Photoshoot) करणारा रणवीर पहिला व्यक्ती नाही. त्याच्याआधी अनेक स्टार्सनी कॅमेऱ्यासमोर बिनधास्त कपडे उतरवले आहेत. न्यूड फोटोशूट त्या-त्या काळी मोठा चर्चेचा विषय बनला होता. (Celebs Nude Photoshoot)

मिलिंद सोमन

मिलिंद सोमनने १९९५ मध्ये एका जाहिरातीसाठी मॉडेल मधु सप्रेसोबत न्यूड फोटोशूट केलं होतं. मिलिंदचे हे वादग्रस्त फोटोज मॉडलिंग जगतातील आयकॉनिक मानले जातात. त्यावेळी मिलिंदवर खूप टीका झाली होती.

आमिर खान

तुम्हाला आमिर खानचा पीके चित्रपट आठवत असेलच. या चित्रपटातील एका दृश्यात आमिर खान कपड्यांशिवाय दिसत आहे. या दरम्यान त्याच्या हातात फक्त एक मोठा रेडिओ राहतो. आमिरच्या 'पीके' चित्रपटाचे हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

शर्लिन चोप्रा

शर्लिन चोप्राच्या 'कामसूत्र 3D' या लघुपटातील बहुतांश दृश्यांमध्ये ही अभिनेत्री नग्न अवस्थेत दिसली आहे. याशिवाय त्याने चित्रपटाच्या सेटवरूनच त्याचा न्यूड फोटो शेअर केला होता. यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ झाला.

सपना भवनानी

सपना भावनानी एक सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आहे. बिग बॉस 6 या रिअॅलिटी शोमध्ये दिसल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पण एका जाहिरातीसाठी तिने कपड्यांशिवाय पोज दिल्याचे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

पूजा बेदी

९० च्या दशकात पूजा बेदीने कंडोमच्या जाहिरातीसाठी कॅमेऱ्यासमोर तिचे कपडे काढले होते. पूजाच्या या फोटोशूटमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news