ranveer singh
ranveer singh

Ranveer nude Photoshoot : रणवीर सिंहने केले न्यूड फोटोशूट

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आतापर्यंत आपण पाहिलं की, वेगवेगळ्या अभिनेत्रींनी अनेकदा न्यूड फोटोशूट केले आहे. आता बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंहनेदेखील न्यूड फोटोशूट (Ranveer nude Photoshoot) केलं आहे. बॉलीवूडचा सुपर एनर्जेटिक रणवीर सिंह अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्याच्याबद्दल कोणताही अंदाज बांधता येत नाही. रणवीर नेहमीच काहीतरी वेगळं करण्यावर विश्वास ठेवतो. पण यावेळी त्याने जे काही केले त्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल. रणवीरने बोल्ड फोटोशूट केला आहे. (Ranveer nude Photoshoot)

रणवीरने न्यूड फोटोशूट केले

रणवीर सिंहने लहान वयात जे यश मिळवले ते सर्वांनाच मिळत नाही. याचे कारण म्हणजे त्याची प्रतिभा आणि आत्मविश्वास, ज्यामुळे तो दररोज पुढे जात आहे. यावेळी रणवीरने न्यूड फोटोशूट करण्याचा आत्मविश्वास दाखवला असून, त्यानंतर सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. त्याने हे फोटोशूट एका मासिकासाठी केले आहे, ज्यामध्ये तो न्यूड होऊन स्टायलिश पोज देताना दिसत आहे.

आता रणवीरने न्यूड फोटोशूट केले आहे, त्यामुळे इंटरनेटवर लोकांना प्रतिक्रिया द्याव्या लागल्या. एका युजरने रणवीरच्या फोटोवर लिहिले, एवढंच बघायचं बाकी होतं. त्याचवेळी कोणीतरी त्याला मोगली सांगत आहे. दीपिकाने कपडे दिले नाहीत, असेही कुणीतरी म्हटले आहे. रणवीरचे हे फोटो पाहिल्यानंतर त्याच्या शब्दकोशात अशक्य नावाचा शब्दच नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

राहुल खन्नानेही केले न्यूड फोटोशूट

रणवीरपूर्वी अभिनेता राहुल खन्ना यानेही न्यूड फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहे. राहुलचे फोटो पाहिल्यानंतरही सर्वांचेच धाबे दणाणले. मलायका अरोरा ते नेहा धुपियापर्यंत त्यांच्या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news